Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोकुळधाम गोरक्षा केंद्राचे गो सेवा कार्य प्रेरणादायी

कोपरगाव शहर ः भगवान महावीर युवा प्रतिष्ठान कोपरगाव संचलित गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोकमठाण यांचा गुरु पौर्णिमेच्या दिवशी अठराव्या वर्षात पदार्पण क

अवास्तव व्याज मागितल्याने सावकारावर गुन्हा दाखल
महिलेच्या केसावर थुंकणार्‍या जावेद हबीबवर गुन्हा दाखल करावा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला दुष्काळग्रस्तांशी संवाद

कोपरगाव शहर ः भगवान महावीर युवा प्रतिष्ठान कोपरगाव संचलित गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोकमठाण यांचा गुरु पौर्णिमेच्या दिवशी अठराव्या वर्षात पदार्पण करत  18 वा  वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. सतत सतरा वर्ष अविरत गो सेवेचे व्रत हातात घेऊन गोरक्षा केंद्राची हे सर्वजण कुठल्याही प्रकारच्या नावाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे काम करत असून याला अठरा वर्षे पूर्ण झाले. या दिवसाचे औचित्य साधून आगळावेगळा व्हेजिटेबल केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले व आजच्या या दिवशी सर्व गोवंशाला वैरण चारा व फळे खाऊ घालून आजची गोसेवा पार पडली. यावेळेस गो शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अविरत 17 वर्षापासून गो सेवा करणारे कोपरगावातील मंगेश पाटील, शिखरचंद जैन, मनोज अग्रवाल, राजेश ठोळे, संजय भन्साळी, संजय बंब, संदीप लोढा, प्रसाद नाईक, गोपीशेठ लोंगणी, सत्यन मुंदडा, हिरेन पापडेचा, ओंकार भट्टड, प्रणित कातकडे, जय बोरा, सद्गुरु जोशी, राजेंद्र देवरे, शिर्डी येथील दर्शन वैद्य,  आदी व्यापारी वर्ग तसेच गोसेवक उपस्थित होते. 17 वर्षांपूर्वी अवघ्या सात गोवंशावर चालू झालेले हे गोसेवा केंद्र आज हजारो गोवंशाचे जीव वाचवत आहे आणि त्याचे योग्य संगोपन करत आहे. यावेळी कोपरगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख साहेब व सौ देशमुख मॅडम यांनी सुद्धा गो सेवा केंद्राला भेट देऊन शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठांण येथील गोकुळधाम गोरक्षा केंद्र हे गेल्या 17 वर्षांपासून अविरतपणे गो मातेची सेवा करत असून त्यांचा हातून यापुढे देखील अशीच गो मातेचे सेवा घडत राहो ही सदिच्छा आजच्या सामाजिक उपक्रम राबविणार्‍या संस्थे समोर हे एक आदर्श उदाहरण आहे.
मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष

COMMENTS