Homeताज्या बातम्यासंपादकीय

काचेचे घर आणि दगडफेक ! 

पूर्वी हिंदी चित्रपटात एक डायलॉग म्हणजे संवाद नेहमी असायचा की, " काच के महलो मे रहने वाले दुसरो के घर पर पत्थर नही फेका करते! मात्र , किरीट सोमय्

धक्के : तीन राजकीय, एक सामाजिक!
मराठा आरक्षण आणि घटनापीठ ! 
प्रतिगामी उदयनराजे आणि पुरोगामी फडणवीस !

पूर्वी हिंदी चित्रपटात एक डायलॉग म्हणजे संवाद नेहमी असायचा की, ” काच के महलो मे रहने वाले दुसरो के घर पर पत्थर नही फेका करते! मात्र , किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये भंडाफोड करण्याची भूमिका घेतली, त्याचे आज नागडे सत्य त्यांच्यावरच उलटले आहे! किरीट सोमय्या यांच्यावर नेहमी आरोप झाले की, ते कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप करतात. परंतु, आता ज्या पद्धतीने त्यांच्यावर हे सगळे आरोप फिरले आहे त्यातून एक नागडं सत्य बाहेर आलं.  हजारो कोटींचे आरोप इतरांवर करत असताना, अनेकदा पुरावे सादर करण्यासाठीही सोमय्या हे मोठ्या प्रमाणात आक्रमक असतात .परंतु इतकं आक्रमण करणाऱ्या माणसाने स्वतः मात्र किती स्वच्छ असायला हवं,  याच समीकरण त्यांना जुळवून घेता आले नाही. अर्थात, या सगळ्या आरोपांमध्ये त्यांच्यावर कारवाई किती प्रमाणात होते, हा खरे तर प्रश्न आहे. मात्र एवढे सत्य नक्की आहे की, त्यांच्या या सगळ्या वागण्यातून अनेकांचे आयुष्य त्यांनी उध्वस्त केले असेल, याची सत्यता पटल्यापासून राहत नाही. तसे पाहिले तर काही क्लिप्स मध्ये ज्या त्यांच्या व्हिडिओ क्लिप ठेवल्या आहेत, त्यामध्ये एक विकृती दिसते आहे. परंतु त्यावर थेट कुणाच्या जीवनाशी खेळण्याचा आरोप करता येईल, असे दिसत नाही. एक मात्र निश्चित की, दुसऱ्यांवर आरोप करताना जी सचोटी आपल्या आयुष्यात पाहिजे ती मात्र किरीट सोमय्यांकडे दिसली नाही. एवढे तर निश्चित या प्रकरणातून म्हणता येईल. सध्या एकंदरीत राजकारण हे आरोप प्रत्यारोपांच्या भोवती फिरत असते. मात्र, राजकारणातील जी सचोटी प्रामाणिकता आणि लोककल्याणाचे उद्दिष्ट किंवा लोकांशी प्रतिबद्ध राहण्याचे जे उद्दिष्ट राजकारणात असायचे, ते आता लोप पावले आहे. बऱ्याचदा अनैतिक बाबींना प्रतिष्ठा मिळण्याचे राजकारण हल्ली जोमाने पुढे येऊ पाहत आहे. त्यामुळेच महिला मल्लांच्या संदर्भात जशी ब्रिज भूषण यांच्या विरोधात खूप कठोर कारवाई होऊ शकली नाही, तशीच गत  किरीट सोमय्या यांच्या चौकशी संदर्भातही होईल, असेच संकेत दिसतात.  त्यांनी स्वतःच्या चौकशीची मागणी करणारा एक अर्ज गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.  त्यामुळे काही असले तरी फडणवीस हे सचोटीचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे ते या प्रकरणाची योग्य ती चौकशी करतील, अशी निश्चितपणे अपेक्षा आहेत. एकंदरीत ज्या राजकारण्यांना राजकीय सत्तेचा दीर्घ अनुभव आहे, अशांकडून भ्रष्टाचार जरी मोठ्या प्रमाणात झालेला असला तरी, त्यावर आरोप करताना मात्र अतिशय स्वच्छ प्रतिमेच्या माणसानेच पुढे यायला हवं. किरीट सोमय्या यांच्यावर सुरुवातीपासूनच सुपारी घेत असल्याचे आरोप राजकीय लोक करीत होते. परंतु, प्रत्यक्षात ते एका राजकीय पक्षासाठी काम करत असल्यामुळे तसं म्हणता येणार नाही. परंतु ते ज्या राजकीय पक्षात काम करतात त्या राजकीय पक्षाच्या भूमिकेतून ते आरोप करीत होते. अर्थात, अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांवर आरोप करताना त्यांची भूमिका ही पक्षपाती वाटत राहीली, त्याचे परिणाम त्यांच्यावर कधी ना कधी उलटणार होतेच! एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात एक व्यक्तिगत ट्विस्ट आला असला तरी, त्याची वेळ चुकलेली आहे. बेंगलोर येथे विरोधी पक्षांची होणारी बैठक आणि मुंबई येथे झालेले रिफायनरी आंदोलन यांच्या बातम्या या गदारोळात दुर्लक्षित झाल्या.

COMMENTS