Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या : आ. जयंत पाटील

आष्टा / वार्ताहर : ही केवळ विधानसभेची निवडणूक नसून विचारांची लढाई आहे. हे राज्य आपण कोणाच्या हातात देणार? याचा निर्णय आपणास घ्यायचा आहे. बहुजन

लोणंद येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण; 31 जुलै रोजी धावणार मॅरेथॉन
राजारामबापू कारखाना अध्यक्षपदी प्रतीक पाटील यांची निवड; उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष विजयराव पाटील
खाद्य पदार्थ पॅकींगसाठी वृत्तपत्राचा वापर टाळण्याचे आवाहन

आष्टा / वार्ताहर : ही केवळ विधानसभेची निवडणूक नसून विचारांची लढाई आहे. हे राज्य आपण कोणाच्या हातात देणार? याचा निर्णय आपणास घ्यायचा आहे. बहुजन समाजाचे हित आणि महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. जयंत पाटील यांनी कवठेपिरान येथील जाहीर सभेत बोलताना केला. कुस्तीची मोठी परंपरा असणारे आपले गांव आहे. एखादा पैलवान मोठ्या पैलवानाबरोबर जोड का धरतो? तर नांव होते. चार पैसे वाढवून मिळतात. मात्र, आपला निकाल काय लागणार आहे, हे त्याला माहित असते, अशी टिपण्णीही त्यांनी केली. यावेळी आ. पाटील यांनी हिंद केसरी स्व. मारुती माने यांच्या आठवणींना उजाळा दिला.
आ. पाटील म्हणाले, सत्ता येते आणि जाते. मात्र, लढणार्‍या माणसांची नोंद इतिहास घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाऊ बाण्याची आपणास परंपरा आहे. राष्ट्रीय नेते पवारसाहेब दिल्लीश्‍वरांच्या विरोधात लढत आहेत. आपणासही लढावे लागेल. स्व. भाऊंनी मला पहिल्या 2009 च्या निवडणुकीत मोठी साथ दिली. गावनेही कायम प्रेम दिले आहे. तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घरा-घरापर्यंत पोचवा.आपण पूर्वी आपले सरकार असताना पेठ-सांगली रस्ता केला होता. हा रस्ता करण्यासाठी मी स्वतः ना. नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला आहे.
याप्रसंगी युवा कार्यकर्ते सचिन पाटील, रोहित साळुंखे, अनिकेत वडगावे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी पै. विनोद वडगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात आ. पाटील यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले. प्रतापराव गुरव यांनी आभार मानले. अवधूत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
ग्रामपंचायत सदस्य सतिश पाटील, संजय काबळे, राजेंद्र तामगावे, प्रकाश सावर्डे, बबन येवले, संग्राम जाखलेकर, सर्वोदय पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब मडके, दादासाहेब मडके, दस्तगीर मुजावर, अकिल मुजावर, शामराव पाटील, बाळासाहेब खिचडे, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप पाटील, तानाजी पाटील, कपिल किर्ते, बाबुराव पाटील, डॉ. जयपाल तामगावे, महादेव पाटील, रमेश पाटील, सुरेश सरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS