Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान परिषदेची एक जागा द्या ः मंत्री आठवले

मुंबई ः महायुतीच्या सरकारमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये रिपाइंला सत्तेत वाटा मिळायला पाहिले. रिपाइंने महायुतीला  लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मतदान केले

सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ठाम
2 एक्स्प्रेस गाड्यांची धडक; 3 डबे घसरले| LOK News 24
गुटखा बंदी नावालाच; पाटण शहरात खुलेआम विक्री

मुंबई ः महायुतीच्या सरकारमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये रिपाइंला सत्तेत वाटा मिळायला पाहिले. रिपाइंने महायुतीला  लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मतदान केले आहे. यापुढेही महायुतीला आरपीआयकडून मदत होणार आहे. मात्र त्याबाबत महायुतीकडूनही आरपीआयला सत्तेत योग्य वाटा मिळायला हवा असा पुनरुच्चार रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला. दरम्यान रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषद सदस्यत्व, विधानसभा निवडणुकीत किमान 10 जागा आणि राज्य सरकारच्या मंत्री मंडळात एक मंत्री पद मिळावे अशी मागणी रिपाइंतर्फे करण्यात आली आहे.

COMMENTS