Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीत तरुणीवर प्राणघातक हल्ला

अमरावती ः  शहरातील राजापेठ परिसरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला चढवल्याची भयंकर घटना बुधवारी सकाळी घडली आहे. या

अबॅकस सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ओम लहू साठे मास्टर अबॅकस पदक विजेता
एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त
भाजपाला सलग सात वर्ष सर्वाधिक देणग्या

अमरावती ः  शहरातील राजापेठ परिसरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला चढवल्याची भयंकर घटना बुधवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून, तरुणींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थिनी राजापेठ अंडरपासमधून महाविद्यालयाला जात होती. तेवढ्यात एका तरुणाने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर तरुण तरुणीच्या ओळखीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS