कोपरगाव शहर : अंजनापूर येथील आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांच्यातर्फे जवळके येथील के.बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास लेझीम ढोल पथक भेट म्हणून दिले. अंजनापूर येथील आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांनी आजपर्यंत जवळके व अंजनापूर परिसरात वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला आहे तर परिसरातील सर्वच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना अनेकदा शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केले आहे. त्यासोबत अनेक आरोग्य शिबीर यशस्वी राबवित रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे रक्तदान शिबिरे राबवत अनेकांचा जीव वाचवत सर्वश्रेष्ठ कार्य केले आहे. सध्या मोबाईलच्या जमान्यात लोप पावत चाललेली महाराष्ट्र संस्कृतीच्या कलेचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या लेझीम व ढोल पथकाचा संपूर्ण संच जवळके येथील के.बी रोहमारे शाळेला भेट देत तेथे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक सुजित रोहमारे यांनी आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांचे शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले तर या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक लक्ष्मण थोरात, सरपंच बाबुराव थोरात, नानासाहेब पाडेकर, थोरात, पत्रकार विनोद जवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन राहाणे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

कोपरगाव शहर : अंजनापूर येथील आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांच्यातर्फे जवळके येथील के.बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास लेझीम ढोल पथक भेट म्हणून दिले.
अंजनापूर येथील आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांनी आजपर्यंत जवळके व अंजनापूर परिसरात वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला आहे तर परिसरातील सर्वच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना अनेकदा शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केले आहे. त्यासोबत अनेक आरोग्य शिबीर यशस्वी राबवित रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे रक्तदान शिबिरे राबवत अनेकांचा जीव वाचवत सर्वश्रेष्ठ कार्य केले आहे. सध्या मोबाईलच्या जमान्यात लोप पावत चाललेली महाराष्ट्र संस्कृतीच्या कलेचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या लेझीम व ढोल पथकाचा संपूर्ण संच जवळके येथील के.बी रोहमारे शाळेला भेट देत तेथे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक सुजित रोहमारे यांनी आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांचे शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले तर या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक लक्ष्मण थोरात, सरपंच बाबुराव थोरात, नानासाहेब पाडेकर, थोरात, पत्रकार विनोद जवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन राहाणे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS