संगमनेर ः माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा, नेट-सेट, सीईटी, नीट या सर्व परी
संगमनेर ः माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा, नेट-सेट, सीईटी, नीट या सर्व परीक्षांचे पुस्तके सहज उपलब्ध व्हावे याकरता कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या एकविरा फाउंडेशनच्या ग्रंथालयास बाळासाहेब सिताराम आंबरे यांनी 50 पुस्तके भेट दिली आहेत. यशोधन जनसंपर्क कार्यालयात अल्फाटेक सिस्टीम नाशिक यांचे संचालक बाळासाहेब सिताराम आंबरे व अमित पवार यांनी ही पुस्तके मुख्याधिकारी श्रीराम कुर्हे यांच्याकडे सुपूर्त केली.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र ठरले आहे. विविध शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थी हे चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन देशात आणि विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. याचप्रमाणे प्रशासकीय सेवेतही संगमनेर तालुक्यातील अनेक विद्यार्थी आपली सेवा देत आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी, यांच्यासह एमपीएससी, यूपीएससी, नेट ,सेट ,तलाठी, ग्रामसेवक ,पोलीस भरती, बँकांच्या भरती या विविध परीक्षा देण्याकरता पुस्तकांची उपलब्धता व्हावी याकरता कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयात सर्वांकरिता मोफत ग्रंथालय सुरू आहे. या ग्रंथालयांमधून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी पुस्तकांची देवाणघेवाण करत असू याचा मोठा लाभ तालुक्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे.यामध्ये योगदान द्यावे याकरता अमृतवाहिनी पॉलिटेक्निक चे माजी विद्यार्थी बाळासाहेब सिताराम अंबरे यांनी आपल्या नाशिक स्थित असलेल्या अल्फाटेक सिस्टीम या संस्थेच्या वतीने विविध 50 पुस्तके या ग्रंथालयास भेट दिली आहे. यावेळी अंबरे म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्याचे काम एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून होत असून नाशिक पुणे पेक्षाही संगमनेर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे आहे. आणि स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांना मोठी संधी राहणार आहे. याचा लाभ सर्व विद्यार्थी वर्गाने घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी श्रीराम कु-हे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
COMMENTS