Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई पोलिसांनी हॉटेलमध्ये २५ किलो गांजा पकडला

बीड प्रतिनिधी - गेवराई  शहरालगत असलेल्या बायपास जवळील एका हॉटेलवर २५ किलो गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली माहिती

पुष्पा चित्रपटामुळेच केला मी हा गुन्हा, मै झुकेगा नही साला
ग्रामीण रुग्णालय राहुरी शहरातच राहणार
Yeola : येवल्यात एसटी बंद ठेवून कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण (Video)

बीड प्रतिनिधी – गेवराई  शहरालगत असलेल्या बायपास जवळील एका हॉटेलवर २५ किलो गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ अधिकारी यांचे पथक घटनास्थळावर दाखल होत. सदरील हॉटेलमध्ये जाऊन झडती घेतली असता त्याठिकाणी २५ किलो गांजा आढळून आला.आढळलेल्या गांजासह एका संशयीत आरोपीस गेवराई पोलिसांनी जेरबंद केले असुन त्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे.गौसखान अमनउल्लाखान असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव असुन सदरची कारवाई २५  जानेवारी मध्यरात्री १ वाजेच्यादरम्यान गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार,सहायक निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत केलीये. सदरच्या कारवाईमध्ये गेवराई पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या फिर्यादी वरूण एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे करत आहेत. 

COMMENTS