Homeताज्या बातम्यादेश

शंभर दिवसांच्या अजेंड्यावरील कामासाठी सज्ज व्हा

नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी होण्यापूर्वी भावी मंत्र्यांनी मोदींच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी य

पंतप्रधान मोदी, शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
खा. शरद पवार व ठाकरेंनी एनडीएमध्ये यावे
पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी होण्यापूर्वी भावी मंत्र्यांनी मोदींच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भावी मंत्र्यांना कानमंत्र देत पुढील 100 दिवसांच्या अजेंड्यावरील कामांसाठी सज्ज व्हा असे आवाहन करत मार्गदर्शन केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदींनी संभाव्य मंत्र्यांना 100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. मंत्रिमंडळात सामील झाल्याबद्दल मोदींनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच आपल्याला विकसित भारताचा अजेंडा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही व्यत्ययाशिवाय विकासकामे सुरू राहणार आहेत. 100 दिवसांच्या आराखड्यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व खासदार सारखेच आहेत. प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करा. गरीब लोक आणि कामगारांवर विशेष लक्ष द्या. किमान चार दिवस मंत्रालयात काम करा आणि उरलेला वेळ शेतात घालवा. कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका. असा संदेश देत नरेंद्र मोदींनी भावी मंत्र्यांना राष्ट्रपती भवनात वेळेपूर्वी पोहोचण्यास सांगितले.

COMMENTS