Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देहरेत सोयाबीन पिकाची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक उत्साहात

अहमदनगर ः अहमदनगर-तालुका कृषी अधिकारी अहमदनगर यांच्या वतीने खरीप हंगामपूर्व तयारी मोहिमेअंतर्गत मौजे देहरे ता.जि.अहमदनगर शिवारात सोयाबीन पिकाची उ

वाळू पकडायला गेले आणि दमदाटी अनुभवली
वाहनचोरी करणार्‍या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

अहमदनगर ः अहमदनगर-तालुका कृषी अधिकारी अहमदनगर यांच्या वतीने खरीप हंगामपूर्व तयारी मोहिमेअंतर्गत मौजे देहरे ता.जि.अहमदनगर शिवारात सोयाबीन पिकाची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षीक घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर म्हणाले की ओल्या गोणपाटावर कोणतेही 100 दाणे 10ु10 आकारात ठेवून सदरील गोणपाटाची व्यवस्थीत गुंडाळी करुन ते 6-7 दिवस सावलीत चांगले पाणी मारुन वाफसा पसीस्थीत ठेवावे.5-6 दिवसानंतर 100 पैकी चांगले उगवुन मोड आलेले दाणे मोजणी करावी.70 टक्केपेक्षा जास्त उगवण असल्यास शिफारस केलेप्रमाणे एकरी बियाणे वापरुन पेरणी करावी.60 टक्केपेक्षा कमी उगवण आल्यास बियाणे पेरणीसाठी वापरु नये अशी माहिती शेतकर्‍यांना त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी, सिद्धार्थ क्षीरसागर, मंडळ कृषि अधिकारी, विजय सोमवंशी गावचे सदस्य, संचालक, शेतकरी गट, कंपनीचे सदस्य व सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते. पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की तालुक्यातील सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असुन तालुक्यामध्ये यंदा 16,500 हे. क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होण्याचा अंदाज आहे.कृषि विभागाच्या योजने अंतर्गत वैयक्तीक अथवा गटांचे माध्यमातुन प्रक्रिया उद्योग चालु झाल्यास शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होईल.नगर तालुक्यात 991 शेतकरी बांधवानी 9365 क्विंटल घरगुती बियाणे ठेवले असुन या सर्वांनी उगवण क्षमता तपासुन पहावी व पेरणी अगोदर बिजप्रक्रिया करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कृषि पर्यवेक्षक विजय सोमवंशी यांनी शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उगवण क्षमता,बिजप्रक्रीया,माती परीक्षण नुसार खतांचा वापर व एकात्मीक किड रोग व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा वापर करणेबाबत आवाहन केले. कृषि सहाय्यक.कविता मदने यांनी पेरणीसाठी ठेवलेले घरगुती सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याची गरज व पद्धत या विषयावर शेतकर्‍यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सदरील खरीप हंगामपुर्व मोहीमा  विभागीय कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषिअधिकारी. पोपटराव नवले यांचे मार्गदर्शनाखाली व यांचे सुचनांनुसार राबवण्यात येत आहे. कार्यक्रमाचे नियोजन कृषि सहाय्यक, कविता मदने, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी केले.

COMMENTS