Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश कारखान्याची सर्वसाधारण सभा उत्साहात

राहाता ः तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व सहकार महर्षी शंकरराव को

स्त्रियांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज -कविताताई आव्हाड
रावसाहेब खेवरे यांची अ‍ॅड लांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
कै. विष्णू उस्ताद आखाडा ठरतोय नागपंचमीची ओळख बदलवणारा आखाडा

राहाता ः तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. राहता व कोपरगाव तालुक्यातील गणेशच्या स्वाभिमानी सभासद, कामगार व शेतकर्‍यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करत आपण गणेश कारखाना ताब्यात घेतला. कारखाना ताब्यात आल्यानंतर शेतकरी, सभासद यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. सभासद व संचालकांच्या सहकार्यातून आता गणेश कारखाना सुरळीत सुरू आहे. याबाबत युवा नेते विवेक कोल्हे व संचालक मंडळाचे कौतुक केले पाहिजे. मागील काळात गणेश कारखाना अनेक वर्ष तोट्यात गेला होता. जे कारभार करत होते त्यांचा हेतू हा कारखाना बंद पाडण्याचा होता. आपला मात्र हेतू हा कारखान्याची प्रगती होऊन या भागाचा विकास व्हावा असा आहे. या गणेश परिसराची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद गणेश कारखान्यात आहे. याप्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे, कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे, माजी चेअरमन नारायण कार्ले, ज्येष्ठ नेते शिवाजीराव लहारे, सर्व संचालक मंडळ, सभासद व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS