Homeताज्या बातम्यामनोरंजन

जेनेलिया-मानवच्या ‘ट्रायल पीरियड’चा ट्रेलर रिलीज

कपडे खरेदी करताना अनेक वेळा तुम्ही त्या कपड्यांचा ट्रायल घेत असाल. ट्रायल घेणे म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी ती वापरुप पाहणे, पण बाबांना ट

पुण्यात पार्किंगमधील दुचाकी जाळल्या
अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू
खोदकामात सापडला 1098 कॅरेट मोठा हिरा LokNews24

कपडे खरेदी करताना अनेक वेळा तुम्ही त्या कपड्यांचा ट्रायल घेत असाल. ट्रायल घेणे म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी ती वापरुप पाहणे, पण बाबांना ट्रायलवर घेतलं आहे, असं कधी तुम्ही कोणाकडून ऐकलं आहे का? नुकताच ट्रायल पीरियड या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात 30 दिवस ट्रायल पीरियडवर घेण्यात आलेल्या वडिलांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. अभिनेत्री जिनिलिया डिसूजा आणि अभिनेता मानव कौल यांचा ट्रायल पीरियड हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये दिसते की, एक लहान मुलगा त्याच्या आईकडे बाबा पाहिजे, अशी मागणी करतो. त्यानंतर त्या मुलाची आई त्याच्यासाठी ट्रायलवर वडील आणते. जिनिलिया डिसूजा आणि मानव कौल यांच्यासोबतच शक्ति कपूर, शीबा चड्ढा, गजराज राव हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात जिनिलिया ही एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे तर मानव हा ट्रायल फादरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ट्रायल पीरियड हा चित्रपट 21 जुलै रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलेया सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कॉमेडी आणि इमोशन्सचा तडका असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

COMMENTS