Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकात शाळेच्या पटांगणात गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम

नाशिक प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स वादात सापडला आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्य

कर्जत, जामखेड तालुक्याच्या आरोग्य विषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – आरोग्य मंत्री राजेश टोपे
एमपीएससीकडून प्रथमच मेगा भरती
ज्ञानशील कुटुंबासाठी प्रत्येक घरात छोटे पुस्तकालय असावे ः डॉ. बाबुराव उपाध्ये

नाशिक प्रतिनिधी – दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स वादात सापडला आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी हा डान्स झाला होता. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या डान्सचा आनंद लुटला होता. मात्र गौतमीचा हा डान्स वादात सापडला आहे. या डान्सनंतर शालेय शिक्षण विभाग आक्रमक झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवसा विद्यार्थी शिक्षण घेत असतात. दिवसा चालणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र डीजे चे मोठमोठे स्पीकर्स सुरु होते. या स्पिकर्सवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नृत्य करत होती. गौतमीच्या नृत्याने परिसरातील तरुणांची मने भिजवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँड साठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. गौतमीचा महाराष्ट्रातील प्रत्येक नाच गाण्याचा कार्यक्रम हा नेहमीच वादग्रस्त ठरतो. त्याप्रमाणे गौतमीच्या या डान्सनंतरही वाद उत्पन्न झाला आहे.

शाळेच्या मैदानात डान्सचा प्रकार घडला असेल तर तो नक्कीच धक्कादायक आहे. संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा यावेळी केसरकर यांनी केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत अशाप्रकारे नृत्याचे प्रकार होऊ शकत नाही. याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे केसरकर यावेळी म्हणाले. दरम्यान पालघरच्या शाळेत शिक्षक सुट्टीवर असल्याने विद्यार्थी जुगार खेळतानाचा प्रकार समोर आला होता. यावर देखील शिक्षणमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालघरमध्ये झेपी शाळेतील शिक्षक रजेवर गेले. हे प्रकरण मला गांभीर्याने घ्यावेसे वाटते. शिक्षक भरती सुरु आहे. आम्ही शाळांमध्ये शिक्षक देतोय.आता भरती सुरु झाल्याने शिक्षकांची गैरहजेरी हा प्रकार येणार नाही, असे शिक्षणमंत्री म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत जुगार खेळणे हे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. पालघर घटनेची चौकशी केली जाईल. याला कोण जबाबदार आहे? त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.

COMMENTS