Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवलाच्या व्यापार वृद्धीसाठी गौतम बँकेची मदत होईल

आमदार आशुतोष काळे यांचा विश्‍वास

कोपरगाव ः जगप्रसिद्ध असलेल्या येवल्याच्या पैठणीचा महिमा सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. येवल्यात पैठणी निर्मितीचा उद्योग व्यवसाय मोठा असून इतरही व्

सात नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीत दाखल करावे
लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात
आ. आशुतोष काळेंकडून कोल्हे गटाला पुन्हा धक्का

कोपरगाव ः जगप्रसिद्ध असलेल्या येवल्याच्या पैठणीचा महिमा सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. येवल्यात पैठणी निर्मितीचा उद्योग व्यवसाय मोठा असून इतरही व्यवसायात येवल्याचे मोठे नाव आहे. येवला शहराच्या या उद्योग व्यवसाय व व्यापार वृद्धीसाठी गौतम बँकेची निश्‍चितपणे मोठी मदत होईल असा विश्‍वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्योजक तथा कापसे पैठणीचे मालक बाळासाहेब कापसे यांच्या हस्ते गौतम सहकारी बँकेच्या नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.यावेळी बँकेच्या संचालिका सौ.सिंधुताई रोहोम व रायभान रोहोम यांच्या हस्ते सत्य नारायणाची महापूजा करण्यात आली.  पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, गौतम बँकेने प्रगतीची गरुड भरारी घेत अनेक घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या आहेत. येवला येथील शाखेच्या रूपाने गौतम बँकेची नववी शाखा सुरू होत असून येवला शहरातील छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायिकांनी त्याचा लाभ घेवून आपल्या उद्योग व्यवसायाची व्याप्ती वाढवावी असे आवाहन केले.

याप्रसंगी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अंबादास बनकर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, माजी नगरसेवक गणेश शिंदे, प्रमोद ससकर, बबनराव जगझाप, अमोल जगझाप, कारखान्याचे माजी संचालक विश्‍वासराव आहेर, अरुण चंद्रे, कोटमगाव जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमने,बाबासाहेब कदम, दिलीपराव कोटमे, श्रावणजी भोरकडे, विनायक सरोदे, मधुकर कोटमे,डॉ.पाटील, कोटमे साहेब, खोकले पाटील, सैद साहेब, सागर झावरे, सुभाषराव कोटमे, अरूण थोरात, जी कापसे, बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,अनिलराव महाले, अरुण थोरात, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लगड, नंदूभाऊ अट्टल,गौतम बँकेचे व्हा.चेअरमन बापूराव जावळे, संचालक श्रीकांत तीरसे, राजेंद्र ढोमसे, विजयराव रक्ताटे, धोंडीराम वक्ते, सुनील डोंगरे, उत्तम भालेराव, तुकाराम हुळेकर, कमलाकर चांदगुडे,अ‍ॅड शिरीषजी लोहकणे, रामराम माळी,शरद होन,तसेच बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे, शाखाधिकारी पंढरीनाथ देवकर आदी मान्यवरांसह येवला शहरातील उद्योगजक, व्यापारी, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS