मुंबई प्रतिनिधी - 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना त्यांच्या घरातीलच आह

मुंबई प्रतिनिधी – ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना त्यांच्या घरातीलच आहेत असे वाटते. त्यामुळे जरी ती पात्र मालिकेत नसली तरी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असाच एक पात्र म्हणजे गौरीचं. अभिनेत्री गौरी कुलकर्णी आता या मालिकेत नाही. परंतु तिच्या पोस्टने ती नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी शेअर केली आहे. गौरी कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गौरी तिच्या हातातील हिऱ्यांची अंगठी फ्लॉन्ट करत आहे. तसेच तिने लिहिले आहे की, ‘इट्स हॅपनिंग’.
गौरीचा २३ सप्टेंबरला वाढदिवस होता. तर वाढदिवशीच गौरीने ही आनंदाची बातमी शेअर केली. ‘इट्स हॅपनिंग’ म्हणजे नेमकं काय? हे अद्याप तिने सांगितलेले नाही. परंतु गौरीचा साखरपुडा झाला असल्याची सर्वत्र चर्चा आहे. गौरीच्या कुलकर्णीच्या या पोस्टवर अनेक सेलेब्रिटी कमेंट करत तिचे अभिनंदन करत आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे, अंविता फलटणकर, राधा सागर, नंदिता पाटकर या कलाकारांनी गौरीच्या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS