मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचे आगमन झाले. धुमधडाक्यात शिल्पा शे

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचे आगमन झाले. धुमधडाक्यात शिल्पा शेट्टी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन आली. मागच्या वर्षी शिल्पा शेट्टी गणपती बाप्पाला आणायला एकटी गेली होती. पण यावर्षी ती आपला पती राज कुंद्रासोबत गणेशगल्ली येथील गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत गेली होती. याठिकाणावरून ती आपल्या बाप्पाला घेऊन घरी गेली. यावेळी शिल्पा शेट्टीला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. शिल्पा शेट्टीने आपल्या घरी गणपती बाप्पाला आणल्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी शिल्पा शेट्टी खूपच आनंदी होती. वाजत-गाजत तिने बाप्पालला आपल्या घरी नेले. शिल्पा शेट्टीने यावेळी हिरव्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर प्रिंटेड ओढणी असा लूक केला होता
COMMENTS