Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीस लाखांचा दरोडा टाकणारी टोळी गजाआड

यवतमाळ प्रतिनिधी - खोदकामात मिळालेले सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून सराफा व्यावसायिकाकडून 20 लाखांची रोकड लुटणार्‍या टोळीला गजाआड करण्यात

मुंबईत उभारणार अल्पसंख्याक वर्गातील मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय : अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे
‘व्यंकटेशा’! अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केव्हापासून ?
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यास प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

यवतमाळ प्रतिनिधी – खोदकामात मिळालेले सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून सराफा व्यावसायिकाकडून 20 लाखांची रोकड लुटणार्‍या टोळीला गजाआड करण्यात आले. त्यांच्याकडून सहा लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, चार आरोपींना  तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई महागाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.सुरेंद्र प्रकाशराव गावंडे (वय 38, रा. आर्णी), असे सराफा व्यावसायिकाचे नाव आहे.  खोदकामात सोन्याची नाणी मिळाली आहे. पाहिजे असल्यास कमी किमतीत विक्रीचे आमिष दाखविले. विश्‍वास पटविण्यासाठी दोन खर्‍या सोन्याची नाणे दाखिले. दीड किलो सोने असून, वीस लाखांत सौदा ठरला. त्यानंतर सराफा व मित्र यांना रोख 20 लाख रुपये घेवून राष्ट्रीय महामार्गावरील नांदगव्हाण शिवारात बोलावले. मारहाण करून सराफाकडील 20 लाख रुपयांच्या रकमेवर दरोडा टाकून पळ काढला. या प्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुन्हा इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS