Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टँकरमधून डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश

कोपरगाव शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील जेऊर कुंभारी शिवारातील उभ्या टँकरमधून डिझेल चोरणार्‍या चार चोरांना मुद्देमालासह अवघ्या 24

* अतिरिक्त बिल वसूल करणाऱ्या दवाखान्यांना दणका l पहा LokNews24*
शरणपूर वृद्धाश्रमात आजी-आजोबांना मिष्टान्न भोजन  
संजीवनी नोकरी महोत्सवातून दहा हजार तरुणांना नोकरीची संधी ः विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील जेऊर कुंभारी शिवारातील उभ्या टँकरमधून डिझेल चोरणार्‍या चार चोरांना मुद्देमालासह अवघ्या 24 तासात जेरबंद केले असून यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे. रामकुमार शिवप्रसाद पटेल यांनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार 29 मार्च रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास जेउर कुंभारी शिवारात समृध्दी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ अलीकडे रस्त्याचे कडेला उभा केलेला कंटेनर मधील 11,160 रुपये किलोचे 120 लिटर डिझेल हे कोणीतरी अज्ञात आरोपीनी चोरुन नेले होते. त्यावरुन कोपरगाव शहर पोलिस स्टेशन गुरजि नंबर 148/2023 भादवि कलम 379,34 प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, समृध्दी महामार्गाजवळ, जेउर कुंभारी शिवारात डिझेल चोरी करणारे काही संशयित इसम आहेत. अशी माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोउपनि भरत दाते, पोहेकॉ आर.पी.पुंड, पोहेकॉ के.ए.जाधव, पोकॉ संभाजी शिंदे, पोकॉ महेश फड, पो कॉ  वाय बी सुंबे, पोकॉ जी. पी. थोरात पोकॉ राम खारतोडे, पोकॉ  गणेश काकडे आदींनी मिळालेल्या माहितीनुसार   त्या ठिकाणावरुन  रविराज किशोर देसले  निमगांववाडी, ता. राहाता, विक्की मच्छिद्र गायकवाड निमगांववाडी ता. राहाता, तान्हाजी किसन वायदंडे  रा.गणेशनगर ता. राहाता व साहेल अली इम्तीयाज सय्यद  रा. शिर्डी ता. राहाता यांना ताब्यात घेत त्यांचेकडेस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता,त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली की, आह्मी 29 मार्च रोजी सर्वांनीच समृध्दी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनर मधील डिझेल चोरी केलेली आहे. व चोरलेले डिझेल रमेश वायदंडे यांचेकडील चारचाकी मधुन रामपुरवाडी रोड शिवारातील पत्राचे हॉटेल मध्ये लपवुन ठेवलेले आहे. असे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जावुन खात्री केली असता, राहाता तालुक्यातील रामपुरवाडी शिवारातील एका हॉटेल मधुन 9765/-रु कि चे 105 लिटर डिझेल ड्रम मध्ये भरलेले. डिझेल भरण्यासाठी असलेले तीन प्लास्टीकचे ड्रम, डिझेल काढण्यासाठी वापरायचे तीन प्लास्टीकचे पाईप असा एकुण 9765/- रु कि चा मुद्येमाल मिळुन आला आहे. चार आरोपींना या गुन्हयात अटक केली असुन त्यांचा साथीदार रमेश तानाजी वायदंडे रा. गणेशनगर ता राहाता हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक, रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ के. ए. जाधव हे करीत आहेत. सदरची कौतुकास्पद  कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधीकारी  संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. रामराव ढिकले, पोउपनि भरत दाते, पोहेकॉ आर.पी. पुंड, पोहेकॉ के.ए.जाधव, पोकॉ संभाजी शिंदे, पोकॉ राम खारतोडे, पोकॉ. गणेश काकडे, पोकॉ जी.पी. थोरात, पोकॉ वाय. के. सुंबे, पोहेकॉ महेश फड यांच्या पथकाने केली आहे.

COMMENTS