Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात गणरायाचे जल्लोषात आगमन

पुणे/प्रतिनिधी : राज्यातच नव्हे तर देशभरात गणरायाचे जल्लोखात आगमन झाले आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर भागात सकाळपासून घरगुती आणि मंडळाचे कार

पवार- विखें यांच्यातील राजकीय वैर तिसरी पिढी संपविणार का?
निफाड तालुक्यात उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारत आवश्यक 
प्रियंका गांधी लढणार वायनाडमधून लोकसभा

पुणे/प्रतिनिधी : राज्यातच नव्हे तर देशभरात गणरायाचे जल्लोखात आगमन झाले आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर भागात सकाळपासून घरगुती आणि मंडळाचे कार्यकर्ते गणरायला घरी आणण्याच्या लगबगीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती झाली आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुले करण्यात आले.
 पुण्यात गणेश मंडळांच्या मिरवणुकांना दिमाखात सुरवात झाली होती. कसबा, गुरुजी तालिम, दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरामुळे पुण्याचा आसमंत दुमदुमला आहे. सांगलीत देखील सकाळपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. पारंपरिक पद्धतीने अनेक मंडळाने गणपतीचे स्वागत केले. येथील मंडळांच्या मिरावणुकीला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठ सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली. रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात सुरु झाली आहे. 

COMMENTS