Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारे गजाआड

राहुरी पोलिसांची कारवाई आरोपीस 2 दिवसांची पोलिस कोठडी

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पंधरा दिवसापुर्वी लग्नाचे आमिष दाखवून पळवुन नेले होते.सदर मुलीचा तपास लावून अल्पवयीन मुलीच

प्रभाग रचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार
पर्यावरण पूरक शाडू मातीची श्री गणेश मूर्ती बनविणे या कार्यशाळाचे आयोजन – आ. मोनिका राजळे 
गावे समृद्ध झाली तरच देश महासत्ता होईल – भास्कर पेरे-पाटील

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पंधरा दिवसापुर्वी लग्नाचे आमिष दाखवून पळवुन नेले होते.सदर मुलीचा तपास लावून अल्पवयीन मुलीची सुटका करुन अपहरण करणार्‍या तरुणास पोलिसांनी गजाआड केले आहे. राहुरी न्यायालयाने आरोपीस 2 दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पंधरा दिवसापुर्वी संगमनेर तालुक्यातील कोंची येथिल तरुणाने अपहरण केले असल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती. राहुरी पोलिसांनी गुप्त खबर्‍या मार्फत व तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करुन संगमनेर तालुक्यातील कोंची रवींद्र भाऊसाहेब बर्डे (वय 20 वर्ष) यास ताब्यात घेवून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. अपहरण करणार्‍या तरुणाने पिडीत तरुणीस राहता येथे ठेवल्याची माहिती खबर्‍यामार्फत पोलिसांना मिळाल्यानंतर तांञिक तपासाच्या आधारे यातील पीडित तरुणीची सोमवार दि. 22  रोजी राहता येथून आरोपीच्या ताब्यातून मुक्त करून आरोपीस ताब्यात घेवून अल्पवयीन मुलीचा जवाब नोंदवून गुन्ह्यात भादवि कलम 366 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.आरोपीस राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात साहय्यक पोलिस निरीक्षक पिंगळे पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार जायभाय,  पोलीस हवालदार आवारे, पोलीस नाईक कोकाटे,  पोलीस कॉन्स्टेबल रवी पवार, पोलिस कॉन्स्टेबल चेमटे यांनी केली आहे.

COMMENTS