Homeताज्या बातम्यादेश

गगनयानची चाचणी 21 ऑक्टोबरला होणार

भारतीय संशोधक जाणार अंतराळात

बंगळुरू ः आदित्य एल 1 आणि चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण केली असून, य

जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईस वेग
जयवंत शुगर्सच्या 11 व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता

बंगळुरू ः आदित्य एल 1 आणि चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण केली असून, या महत्त्वाकांक्षी मोहिमेची महत्त्वाची चाचणी या महिन्यात केली जाणार असून या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. भारताचे संशोधक पहिल्यांदाच अंतराळात जाणार असल्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.
गगनयान ही भारताची पहिलीच अंतराळ मोहीम असून इस्रो 21 ऑक्टोबरला या मोहिमेतील अबॉर्ट मिशन -1 चे प्रक्षेपण करणार आहे. या मोहिमेसाठीच्या पहिल्या क्रू मॉड्यूलची पहिली अबॉर्ट चाचणी या महिन्यात घेतली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेच्या यशानंतरच पुढील दिशा आणि योजना आखली जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, टिव्ही -डी 1 ची पहिली मानवरहित चाचणी या महिन्याच्या 21 तारखेला घेण्यात येणार आहे. त्यानंतर टिव्ही -डी 2, टिव्ही -डी 3 आणि टिव्ही -डी 4 अशा आणखी तीन चाचण्या घेण्यात येतील. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळात कोणतीही अडचण पृथ्वीपासून 17 किमी उंचीवर चाचणी करण्यात येणार्‍या यानापासून क्रू मॉड्युल वेगळे होण्याची अपेक्षा आहे. या चाचणीत क्रू मॉड्युलचं लॉन्च व्हेईकलद्वारे प्रक्षेपण करण्यात येईल. त्यांनतर ठराविक उंची गाठल्यानतर क्रू मॉड्युल वेगळे होईल. अबॉर्ट मिशन पूर्ण केल्यानंतर ते बंगालच्या उपसागरात लँड होईल. त्यांनतर नौदलाकडून हे क्रू मॉड्युल ताब्यात घेतले जाणार आहे. दरम्यान गगनयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ’व्योमीत्र’ हा रोबोट अंतराळात पाठविण्यात येणार आहे.

COMMENTS