Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाडगेबाबा प्रतिष्ठानतर्फे सोमैया महाविद्यालयास ५० ग्रंथांची भेट

कोपरगाव :  आजच्या मोबाईल व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी आपणा सर्वांचे

नव्याने दिलेले कुणबी दाखले रद्द करण्यासाठी पाथर्डीत उपोषण
काँग्रेस सेवादलाच्या तालुकाध्यक्षपदी शब्बीर शेख
BREAKING : अहमदनगर जिल्ह्यात अँटीजेन चाचणी वाढणार | Lok News24

कोपरगाव :  आजच्या मोबाईल व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी आपणा सर्वांचे सकारात्मक प्रयत्न गरजेचे आहेत. कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील सोमैया महाविद्यालय एक नामांकित महाविद्यालय असून येथील विद्यार्थी वक्तृत्व, वादविवाद, काव्य-लेखन, निबंध-लेखन तसेच अभिनय व क्रीडा या कलाप्रकारात राष्ट्रीय व राज्यस्तरावर नेत्रदीपक यश प्राप्त करीत आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे असे गौरवोद्गार संगमनेर येथील श्री संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. चंद्रभान देशमुख यांनी काढले. स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी विभाग, वाङ्मय मंडळ व संत गाडगेबाबा भानू प्रभाकार सेवा प्रतिष्ठान संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, प्रा. संदीप सातपुते, सुधीर डागा व प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चालू शैक्षणिक वर्षात सोमैया महाविद्यालयाच्या स्थानिक तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व, वादविवाद, निबंध, काव्य-लेखन, अभिनय व क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना संगमनेर येथील संत गाडगेबाबा भानू प्रभाकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. चंद्रभान देशमुख यांनी १३५०० किमतीचे ५० ग्रंथ भेट दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप रोहमारे यांनी ग्रंथदाते प्रा. चंद्रभान देशमुख यांचे आभार मानले.

COMMENTS