Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जानपीर विद्यालयात थोर समाजसेविका फुंदाबी पठाण (आम्मा) यांची जयंती उत्साहात साजरी

पाटोदा । प्रतिनिधीजानपीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नाळवंडी/कारेगाव, ता. पाटोदा, जि. बीड येथे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी थोर समाजसेविका

मळगंगादेवीच्या पालखी मिरवणूकीचे जल्लोषात स्वागत
ग्राॅक : जगाची उध्वस्ती की उन्नती ?
कर्नाटक सरकार विधानसभेतून हटवणार सावरकरांची प्रतिमा ; भाजप आक्रमक

पाटोदा । प्रतिनिधी
जानपीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नाळवंडी/कारेगाव, ता. पाटोदा, जि. बीड येथे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी थोर समाजसेविका श्रीमती फुंदाबी पठाण (आम्मा) यांची जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी झाली.
सकाळी 8.30 वाजता विद्यालयाच्या वतीने स्वर्गीय आम्मा यांच्या समाधीस्थळी चादर वाहण्यात आली. विद्यालयात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीताच्या सूरांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते आम्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच त्यांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने केले गेले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री. खेत्रे सर यांनी आम्मा यांच्या आठवणी विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या. त्यांनी सांगितले की आम्मा नेहमी गरजू लोकांच्या मदतीस तत्पर असायच्या आणि विद्यार्थ्यांनीही अशीच मानवता आत्मसात करावी. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. भार्गव सपकाळ साहेब यांनी पुण्यतिथीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना अडचणींमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आजच्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती डोंगरकिन्ही केंद्रप्रमुख श्री. सोंडगे जी.टी. सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त खास सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले, ही शाळा माझी आहे, विविध उपक्रमांचा येथे अनुभव घेऊन आनंद झाला. माझ्या सेवानिवृत्ती निमित्त हा सत्कार हा माझ्यासाठी मोठा गौरव आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मौलाना चांद हाफिज सहाब रायमोह यांनी विद्यार्थ्यांना सर्वधर्म समभाव आणि जीवन कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच गोवर्धन जाधव (विमा प्रतिनिधी व पत्रकार) यांनी सांगितले की ही संस्था संघर्षातून सुरू झाली असून प्रत्येकाने आपल्या भविष्याचा निर्माता स्वतः व्हावे. संस्थेचे संचालक श्री युसुफ सर यांनी सांगितले की आम्माने एका अशिक्षित महिलेने आपल्या मुलाला शिक्षित केले, आणि त्यांचा व्यक्तिगत जीवनातही मोठा योगदान आहे. संस्थेचे सचिव श्री. पठाण जे. एल. साहेब यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा करणे हे आम्माला खरी श्रद्धांजली ठरेल असे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. इकबाल पठाण सर आणि शेख जाकीर सर यांच्या हस्ते विद्यालयातील गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच श्री. गोवर्धन जाधव साहेब यांनी शैक्षणिक साहित्य आणि शालेय ड्रेस वाटप केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक परमपूज्य डॉ. सय्यद रफीक पारनेरकर महाराज यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील प्रामाणिकपणा, आई-वडिलांचा आदर आणि मानवतेची सेवा याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्यही विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील साबळे सर यांनी केले, अध्यक्षीय सूचना जेष्ठ शिक्षक श्री. शेख नसीर सर यांनी मांडल्या, तर उपस्थितांचे आभार शिक्षक श्री. धनाजीराव पाटील सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

COMMENTS