Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आद्यपुरुष एकलव्यांच्या स्मारकासाठी निधी द्या

आ.आशुतोष काळेंची पालकमंत्री विखे यांच्याकडे मागणी

कोपरगाव : कोपरगाव शहरात विविध महापुरुषांची स्मारक आहेत. त्याप्रमाणेच आदिवासी बांधवांचे दैवत आद्यपुरुष एकलव्य यांचे देखील स्मारक व्हावे अशी मतदार

कोपरगाव मतदारसंघात उद्या 300 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
येवलाच्या व्यापार वृद्धीसाठी गौतम बँकेची मदत होईल
कोपरगाव शहरातील 323 कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी

कोपरगाव : कोपरगाव शहरात विविध महापुरुषांची स्मारक आहेत. त्याप्रमाणेच आदिवासी बांधवांचे दैवत आद्यपुरुष एकलव्य यांचे देखील स्मारक व्हावे अशी मतदार संघातील तमाम आदिवासी बांधवांची मागणी असून आद्यपुरुष एकलव्य यांचे स्मारक उभारण्यासाठी 50 लक्ष रुपये निधी द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असून त्याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
            दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ आदी महापुरुषांचे स्मारक आहेत. कोपरगाव मतदार संघात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कोपरगाव मतदार संघात इतर महापुरुषांच्या स्मारकाप्रमाणेच आद्यपुरुष एकलव्य यांचे देखील स्मारक व्हावे अशी तमाम अदिवासी समाज बांधवांबरोबरच माझी देखील इच्छा आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात भव्य दिव्य आद्यपुरुष एकलव्य यांचे स्मारकासाठी 50 लक्ष रुपये निधी मिळावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केलेली आहे.त्या मागणीची पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी सकारात्मकपणे दखल घेवून आद्यपुरुष एकलव्य यांचे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांना दिली आहे.  

COMMENTS