Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खून व अ‍ॅट्रासिटी गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

कोपरगाव प्रतिनिधी ः खून व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यापासून फरार असलेल्या गणेश शंकर गावंड वय वर्ष 33 या आरोपीस कोपरगाव तालुका ग

कर्जतमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्तारोको
आधुनिक पिकतंत्रज्ञान अवगत करणे हि काळाची गरज :- आ. आशुतोष काळे
मनपा लसीकरणाचा झाला बट्ट्याबोळ, नगरकरांना धरले जाते वेठीस

कोपरगाव प्रतिनिधी ः खून व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यापासून फरार असलेल्या गणेश शंकर गावंड वय वर्ष 33 या आरोपीस कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.


सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मंजूर येथील रहिवासी असलेल्या गणेश शंकर गावंड व त्यांच्या कुटुंबाने शेतीच्या वादातून त्याच गावातील रहिवासी असलेला अनुसूचित जातींचे नामदेव सोनवणे यांचा मारहाणीत खून केला होता, त्यामुळे गणेश गावंड याच्यावर कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 322/2022  अनुसूचित जाती जमाती (अत्याचारास प्रतिबंध) सुधारणा कायदा अंतर्गत अ‍ॅट्रॉसिटी व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा घडल्यापासून स्वतःला अटकेपासून वाचवण्यासाठी गणेश गावंड हा आरोपी गेल्या महिन्यापासून फरार होता. सदर घटनेकडे तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. गेल्या चार महिन्यापासून पोलिस सदर आरोपीचा कसोशीने शोध घेत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत फरार आरोपी हा कोपरगाव तालुका व लगतच्या सिन्नर तालुका भागात जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा लागलीच पोलिस पथका मार्फत शोध घेतला असता फरार आरोपी गणेश गावंड मिळून आला. सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक कृष्णा कुर्हे तसेच सायबर सेल श्रीरामपूर येथील पोलीस नाईक प्रमोद पवार, पोलीस नाईक फुरकान शेख यांनी केले आहे.

COMMENTS