Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशासह राज्यात इंधन पुरवठा खंडित

जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेवर परिणाम

नवी दिल्ली/मुंबई ः ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी पुकारलेला संप म

राहुल गांधींनी अटलजींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन
प्रा. साईबाबांसह पाच जणांची निर्दोष मुक्तता
पर्यावरणाशी संबंधित आयडियाज 4 लाइफ पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली/मुंबई ः ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी पुकारलेला संप मंगळवारी देखील सुरूच होता. त्यामुळे देशासह महाराष्ट्रात इंधन पुरवठा खंडित झाल्याचे चित्र होते. मंगळवार सकाळपासून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी अनुभवायला मिळाली, तर अनेक ठिकाणी पेट्रोल संपल्याच्या पाट्या लागल्याचे दिसून येत होते. पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे दूध, भाजीपाला, मेडीकल सह जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यावर मर्यादा येतांना दिसून येत होती.

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील ट्रक चालकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या ट्रक चालकांनी कामबंदचा इशारा दिल्याने अनेक ठिकाणी ट्रक उभे राहिले आहेत. परिणामी, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, भाजीपाला, बांधकाम साहित्य आणि किराणा सामानाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका इंधन वितरणाला बसला आहे. काही पेट्रोल पंपांपर्यंत ट्रक पोहोचू न शकल्याने अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन संपले आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी हा संप मागे घेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हा संप अद्यापही सुरूच आहे. नाशिकमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने संप मागे घेण्यात आला, मात्र इतर जिल्ह्यात हा संप सुरूच असल्याचे चित्र होते. नवी मुंबईमध्ये मात्र, ट्रकचालकांनी संप सुरूच ठेवला आहे. यामुळे इंधन अनाई भाजीपाला आवकेवर परिमाण झाला आहे. यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये पेट्रोलियम ट्रक चालकांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यांनी अद्याप देखील माघार घेतली नाही. असे असले तरी कोल्हापुरात सध्या तरी इंधन पुरवठ्यात तुडवडा भासला नाही. मात्र, काल पसरलेल्या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली होती. इंधन पुरवठा पूर्ववत न झाल्यास बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 210 पैकी बहुतांश पेट्रोलपंप कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोल पंप मालक असोसिएशनने ही माहिती दिली आहे. मनमाड लगत असणार्‍या 3 महत्त्वाच्या तेल कंपन्यांतून दररोज हजारो टँकरद्वारे इंधन पुरवठा केला जातो. येथून जवळपास 75 लाख लिटर पेट्रोल डिझेल राज्यभरात पुरवले जाते. पण ट्रक चालकांच्या संपामुळे हा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड या जिल्ह्यांना या संपाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
मध्यप्रदेशातही हीच स्थिती निर्माण झाली आहे. भोपाळमध्ये वाहतूक सेवा खंडित झाल्याने प्रवाशांना एक-दीड तास बस किंवा टॅक्सीची वाट पाहावी लागत आहे. गुजरातमधील खेडा, वलसाड, गिर सोमनाथ, भरूच आणि मेहसाणा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शकांनी सोमवारी वाहने उभी करून आणि नाकेबंदी करून महामार्ग रोखले. त्यांनी मेहसाणा-अंबाजी आणि अहमदाबाद -इंदौर महामार्ग यांसारखे प्रमुख मार्ग टायर जाळून तात्पुरते रोखले, त्यामुळे व्यत्यय निर्माण झाला होता.  

पुरवठा सुरळीत करण्याचे पोलिसांना निर्देश – आता महाराष्ट्र राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत. गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पोलिसांनी आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

एसटीची चाके थांबण्याची शक्यता – केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. नव्या वर्षाची सुरूवातच संपाने झाल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत आहे. भाज्यांचे दर कडाडले आहेत, काही शहरातील स्कूल बस झाल्या आहेत, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने पेट्रोल पंपांवर गर्दी आहे. त्यातच आता डिझेल अभावी एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

COMMENTS