Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यसेनानी बा. ह. नाईकवाडी यांची जयंती उत्साहात

अकोले ः श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी व थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा. ह.नाईकवाडी तथा बाबा यांची 101 वी जयंती मोठ्या उत्

पढेगाव ग्रामपंचायतकडून महिलांचा सन्मान
सोनईमध्ये पाळला कडकडीत बंद
पोलिसांनी केले तब्बल सव्वाचार लाखाचे मोबाईल जप्त

अकोले ः श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी व थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा. ह.नाईकवाडी तथा बाबा यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर व वारकरी संप्रदायाचे अत्यंत गाढे अभ्यासक, वक्ते तथा प्रबोधनकार ह भ प ज्ञानेश्‍वर महाराज वाबळे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बाबांच्या 101 व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या विविध विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व त्यातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विद्यार्थी यांचा ह भ प वाबळे महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आपल्या प्रमुख संगीत प्रवचनात मार्गदर्शन करताना वाबळे महाराजांनी समाजाच्या विविध प्रश्‍नांची मांडणी करताना संतांच्या अभंगातून वास्तव समोर ठेवत समाजाच्या दांभिकपणावर प्रहार केले व कर्मकांडात अडकलेल्या, देव धर्म, जाती पातीच्या स्वार्थी प्रवृत्ती, बुवाबाजीच्या विषारी विळख्यातून बहुजनांना बाहेर काढत ज्ञानाच्या अवीट गोडीने लोकशिक्षण देणारे, सर्वधर्मसमभावाची अखंड विचारांची ज्योत खेड्यापाड्यात पेटवणारे गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी तथा बाबा यांचा विचार समाजपरिवर्तनाचा होता असे ते म्हणाले. देव कधी दिसला नाही, पाहिला नाही मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा संविधानाचा अर्थ ओळखत शेतकरी, कामगार आणि गोरगरीब मुला मुलीच्या शिक्षणाची सोय निर्माण करणारे बाबा यांच्यात आपण माणसातला  देव शोधावा असे सांगितले. देव देवतांच्या, स्वार्थी धर्माच्या कचाट्यात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचे अविरत काम म्हणजे संतांचा विचार, वारकरी संप्रदायाचा विचार असल्याचे स्पष्ट करत बाबांनी शिक्षण हे परिवर्तनाचे साधन ओळखून  ब्रिटिश काळात स्वतःला झोकून देत वेगवेगळ्या आंदोलनातून स्वातंत्र्यलढ्याची चळवळ अधिक धगधगती ठेवत आपल्या समविचारी सहकार्‍यासोबत संघर्ष केला, म्हणून बाबा हे थोर तपस्वी व कर्मशील होते आणि आजही त्यांच्या नंतर त्यांचे कुटुंबीय हे विचार घेऊन पुढे जात आहेत ही अभिमानाची बाब आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेच्या अध्यक्ष शैलजा पोखरकर यांनी प्रास्ताविक केले तर प्राचार्य चंद्रकांत सहाणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, भानुदास पोखरकर, पत्रकार संघाचे विश्‍वस्त विजयराव पोखरकर, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. के.डी. धुमाळ, ह.भ.प. चेतन महाराज भांगरे, जोंधळे महाराज, सोपानराव एखंडे, अरुण शेळके यांचेसह संस्थेतील आजी माजी मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय सूचना प्राचार्य शिवाजी धुमाळ यांनी तर अनुमोदन सुनिता शेलार पाणी दिले   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिष आंबरे, मिनाक्षी रोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिताराम पथवे यांनी केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS