जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबसाठी 71 लाखाचा निधी मंजूरसातारा / प्रतिनिधी : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात होत असलेल्या कॅथलॅब

जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबसाठी 71 लाखाचा निधी मंजूर
सातारा / प्रतिनिधी : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात होत असलेल्या कॅथलॅबसाठी आवश्यक असणारी उद्वाहक यंत्रणा, विद्युत पुरवठ्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 71 लाख 58 हजार 535 रुपये निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सुसज्ज कॅथ लॅब लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे काही दिवसानंतर सातारच्या जिल्हा रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती शिवेंद्रसिंहराजे यांच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा रुग्णालयात हृदय रुग्णांसाठी आवश्यक असणारी कॅथलॅब सुविधा मंजूर झाली होती. जिल्हा रुग्णालय येथे कॅथ लॅब स्थापन करण्यासाठी बांधकाम सुरू आहे. याचा वेळोवेळी आढावा शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून घेत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कॅथ लॅब निर्मितीमुळे जिल्ह्यातील गरीब व गरजू हृदय रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळण्याची सुविधा मिळणार आहे.
कॅथ लॅबमध्ये हृदय रुग्णांकरिता बाह्यरुग्ण सेवा, तसेच ईसीजी, टू-डी ईको व हृदय रुग्णांकरिता आवश्यक असणार्या सर्व चाचण्या तसेच अॅन्जिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी व बायपास सर्जरी आदी सुविधा तसेच 10 बेडचा अतिदक्षता विभाग होणार आहे.
जिल्ह्यातच आता अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे सातारा जिल्हा वासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना नवा आयाम मिळेल व गोरगरीब गरजू रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS