Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज पुरवठा खंडित करण्याच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

पुणे ः वीजपुरवठा खंडीत करण्यार असल्याचे सांगून सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाची 7 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केल्यचा प्रकार उघडकीस आला. याबाबत

खजिन्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक
 पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषातून 21 लाख 24 हजारांची फसवणूक
‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.

पुणे ः वीजपुरवठा खंडीत करण्यार असल्याचे सांगून सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाची 7 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केल्यचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गौरव जोशी असे नाव सांगणार्या सायबर चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी मुंबई-पुणे रस्ता परिसरातील बोपोडी परिसरात राहायला आहेत. गोैरव जोशी असे नाव सांगणार्या चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधत महावितरणमध्ये अधिकारी असल्याचे सांगितले. वीज देयक न भरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे सांगून मोबाइलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना अ‍ॅपमध्ये बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितले. बँक खात्याच्या गोपनीय माहितीचा गैरवापर करून चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून सात लाख 63 हजार रुपये चोरले. पोलीस निरीक्षक एस चोरमले तपास करत आहेत. तर दुसर्‍या एका घटनेमध्ये सायबर चोरट्याने एकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. कात्रज परिसरातील एकाला 16 लाख 50 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 6 फेब्रुवारी ते जून 2024 कालावधीत घडली असून, गुजरवस्ती परिसरात राहणार्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हा कुटूंबासह गुजरवस्ती परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्याने त्यांना व्हॉटसअ‍ॅप मेसेज केला.शेअर मार्वेैटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कसा मिळतो, हे दाखविणयासाठी सायबर चोरट्यांनी त्यांना एका ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. त्याठिकाणी शेअर मार्वेैटबाबत लिंक शेअर करून जास्त नफा कमविण्यात येत असल्याचे भासविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअरमध्ये गुंंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार फिर्यादीने 16 लाख 50 हजार रूपये चोरट्यांच्या बँकखात्यात वर्ग केले. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली.

COMMENTS