मेधा पाटकर यांच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेधा पाटकर यांच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

बडवानी: आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या विरोधात मध्यप्रदेश

मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते, म्हणून तरुणाचा खून l
महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात पून्हा एका धमकीचा फोन

बडवानी: आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या विरोधात मध्यप्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मध्यप्रदेशातील बडवानी येथे त्यांच्या विरोधात भादंविचे कलम 420 अन्वये हा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस अधीक्षक दीपक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी पाटकर आणि अन्य अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रीतम राज बडोले यांनी दिलेल्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. तत्पूर्वी, पोलिसांनी या प्रकरणावर भाष्य करण्याचे टाळले होते. बडोले यांनी दिलेल्या तक्रारीत मेधा पाटकर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी मुलांना प्राथमिक स्तरावर शिक्षण देण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता असल्याचा आव आणून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.

COMMENTS