Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटारसायकल चोरणारी चौथी टोळी जेरबंद

साडेसहा लाखाच्या 7 मोटारसायकली पोलिसांकडून जप्त

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील मोटारसायकलची चोरी करणार्‍या चौथ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील संगमनेर येथील तरुणाकड

गंगा-जमुना तहजीब बरकरार रहे : मूफ्ती अफजल पठाण
डॉ आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे – अँड.नितीन पोळ
घोगरगाव वीज सबस्टेशनला मंजुरी; नामदार तनपुरे यांनी दिले आदेश

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील मोटारसायकलची चोरी करणार्‍या चौथ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील संगमनेर येथील तरुणाकडून 6 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या मोटारसायकल चोरास राहुरी न्यालयाने सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनवली आहे.
            याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील राहुरी शहराजवळील पिंपळाचा मळा यांच्या घरासमोर लावलेली पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने एक वर्षापूवी चोरुन नेली होती. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर 965/ 2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.एक वर्षापूर्वी चोरी केलेल्या इसमाची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना खबर्‍यामार्फत चोरी करणारा संगमनेर येथील रेहान शकील शहा हा राहुरी शहरात आला असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी गुन्हे शाखेच्या पथकास रेहान शकील शहा यास ताब्यात घेण्यास सांगितले. त्यास पथकाने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटरसायकल चोरीची गुन्ह्याची कबुली दिली. राहुरी न्यायालयात रेहान शकील शहा यास हजर केले असता.सहाय्यक सरकारी अँड.रविंद्र गागरे यांनी बाजू मांडली  न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. पोलिस कोठडीत अधिक तपास केला असता अन्य साथीदाराच्या मदतीने चोरलेल्या एकूण 6 लाख 50 हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकल काढून दिल्या.त्याच्या अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली  सहाय्यक फौजदार तुळशिराम गीते, पोलिस हे.कॉ. बाबासाहेब शेळके, विकास वैराळ, विकास साळवे, संदीप ठाणगे, हे. कॉ. सुरज गायकवाड, पो.ना. प्रवीण बागुल, पो.कॉ. प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले, सतीश कुर्‍हाडे, अमोल भांड यांनी केली.

COMMENTS