जनरल बिपीन रावत यांच्यासह १४ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनरल बिपीन रावत यांच्यासह १४ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

नवी दिल्ली: चीफ ऑफ डिफेन्स (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला आज, बुधवारी तामिळनाडुत अपघात झाला.यामध्ये त्यांच्यासोबत १४ जण प्रवास करत होत

अन्नत्याग आंदोलनात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 100 महिला घेणार सहभाग
जात पडताळणी समितीची आजपासून विशेष त्रुटी पुर्तता मोहिम
जावळीच्या तहसीलदारांनी मालदेव घाटातील वणवा कर्मचार्‍यांसोबत विझवला

नवी दिल्ली: चीफ ऑफ डिफेन्स (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला आज, बुधवारी तामिळनाडुत अपघात झाला.यामध्ये त्यांच्यासोबत १४ जण प्रवास करत होते. बिपिन रावत यांच्यासह १४ जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आगीचा भडका उडाला. हेलिकॉप्टरमुळे काही झाडेही कापली गेली. त्यानंतर काही वेळाने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते. त्यापैकी 1४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यावरून हा अपघात किती मोठा होता हे दिसून येते. हेलिकॉप्टर संपूर्णपणे जळून खाक झालेलं या फोटोत आणि व्हिडीओत दिसत आहे. तसेच आजूबाजूचे काही झाडंही जळून गेल्याचं दिसत आहे.

बिपीन रावत यांच्याबद्दल

देशात 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) हे पद सैनिकी मोहिमेदरम्यान तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम करण्यासाठी तयार करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी लाल किल्ल्यावर भाषण देताना सीडीएस पदाची घोषणा केली होती. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. त्यानुसार जनरल बिपिन रावत यांची भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून 31 डिसेंबर 2019 नियुक्ती करण्यात आली. सध्या त्यांच्याकडेच सीडीएस पदाचा कार्यभार आहे. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात आले आहे. जनरल बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी झाला. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून 31 डिसेंबर 2019 रोजी जनरल बिपिन रावत यांनी कार्यभार स्विकारला. यापूर्वी भारताचे 26 वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या रावत सप्टेंबर 2016 मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. 2016 मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून तोपर्यंत ते लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून आणि त्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे इन कमांड होते. लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर 1978 मध्ये सैन्यात दाखल झाले. ’11 गोरखा रायफल्स’च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली होती. 1986 मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा संभाळली आहे.

सीडीएस पदासंदर्भात केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की, सीडीएस थेट सेना, वायु सेना आणि नौदलाच्या कमांड आणि युनिट्सवर नियंत्रण ठेवणार नाही. परंतु त्या अंतर्गत सैन्याच्या तीन भागाची समान कमांड व विभागणी होईल. सध्या अंदमान निकोबार कमांड ही ट्राय सेवा कमांड आहे जी आता सीडीएस अंतर्गत काम करेल. याव्यतिरिक्त, स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेस विभाग (आर्मर्ड फोर्सेस स्पेशल ऑपरेशन्स विभाग) आणि डिफेन्स सायबर एजन्सीसह स्पेस सायबर एजन्सी आता सीडीएस अंतर्गत काम करतील. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचं नेतृत्व केले आहे. भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे.

COMMENTS