नांदेड प्रतिनिधी - आज सकाळी दहा वाजता मुदखेड तालुक्यातील इसार पेट्रोल पंपा जवळील वळण रस्त्यावर नांदेड हुन भुतकर येत असलेल्या मालवाहू ट्रक आणि

नांदेड प्रतिनिधी – आज सकाळी दहा वाजता मुदखेड तालुक्यातील इसार पेट्रोल पंपा जवळील वळण रस्त्यावर नांदेड हुन भुतकर येत असलेल्या मालवाहू ट्रक आणि नांदेड कडे मुखेड होऊन जात असलेल्या ऑटोची समोरासमोर धडक झाली. यात जागेवरच चार लोकांचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती असून इतर सात गंभीर जखमींना पुढच्या उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे सरोजा रमेश भोई ४० रा. मेहकर जिल्हा बुलडाणा, कल्याण भोई २४ रा. गेवराई जिल्हा बीड, जोयल कल्याण भोई गेवराई जिल्हा बीड, पुंडलिक किशनराव पोलाटकर रा. सावरगाव माळ ता. भोकर जेष्ठ नागरिक वय ७० चारही मृत्यू पावलेल्या लोकांना मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळतात मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सौभाग्यवती कमल शिंदे यांच्यासह मुदखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
COMMENTS