Homeताज्या बातम्यादेश

एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं आयुष्य

वाराणसी प्रतिनिधी - वाराणसीमधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. शहरातील कैलास भवन येथील एका इमारतीत एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन सामूह

कर्जबाजारीला कंटाळुन शेतकर्‍याची आत्महत्या
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीची आत्महत्या
४७ वर्षीय महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

वाराणसी प्रतिनिधी – वाराणसीमधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. शहरातील कैलास भवन येथील एका इमारतीत एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी येथील कैलाश भवन येथील तीन मजली रहिवाशी इमारतीत ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील 4 जणांना आत्महत्या केली आहे. एक महिला आणि 3 पुरुषांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी चार मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. एकाच कुटुंबातील चारही जण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतांमध्ये एक महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. हे चारही जण आंध्र प्रदेशमधील राहणारे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहे.

COMMENTS