हिंद सेवा मंडळावर आले चार नवे चेहरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंद सेवा मंडळावर आले चार नवे चेहरे

निवडणूक झाली बिनविरोध, सेवक प्रतिनिधींसाठी मात्र 29 ला मतदान

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील शतक महोत्सवी प्रसिद्ध शिक्षण संस्था हिंद सेवा मंडळाच्या विश्‍वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या नव्या विश

संगणक शिक्षण ही काळाची गरज ः संजय जोशी
पाथर्डीतील खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद
निळवंडेचा लोकार्पण कृती समितीचे आंदोलक स्थानबद्ध

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यातील शतक महोत्सवी प्रसिद्ध शिक्षण संस्था हिंद सेवा मंडळाच्या विश्‍वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या नव्या विश्‍वस्त मंडळात अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक (अहमदनगर) व मानद सचिवपदी विद्यमान मानद सचिव संजय जोशी (श्रीरामपूर) यांची निवड झाली आहे. तसेच कार्यकारिणीच्या 15 जागांही बिनविरोध झाल्या असून, यात नगरचे अनंत देसाई व ज्योती कुलकर्णी, श्रीरामपूरचे रणजित श्रीगोड व अकोल्याचे दिलीपकुमार शहा असे चार नवे चेहरे संचालक झाले आहेत. दरम्यान, संस्थेच्या सेवक प्रतिनिधींच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने येत्या 29 मे रोजी यासाठी निवडणूक व 30 मे रोजी मतमोजणी होणार आहे. हिंद सेवा मंडळाच्या 23 जागांसाठी 38 उमेदवारांचे अर्ज रिंगणात दाखल झाले होते. 13 मे रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत होती. अध्यक्षपद व मानद सचिव या प्रत्येकी एका जागेसाठी अनुक्रमे 2 व 3 उमेदवारांनी अर्ज भरले होते. तसेच नगर विभागातील कार्यकारिणीच्या 10 जागांसाठी 15, श्रीरामपूर विभागातील 3 जागांसाठी 4 आणि अकोले व मिरजगाव विभागातील प्रत्येकी एका जागेसाठी प्रत्येकी एक अशा एकूण 17 जागांसाठी 28 आणि सेवक प्रतिनिधींच्या 6 जागांसाठी 10 अशा मिळून 23 जागांसाठी 38जण रिंगणात उतरल्याने चुरस वाढली होती व यापैकी किती माघार घेतात, याची उत्सुकता वाढली होती.

17 जागा झाल्या बिनविरोध
13 मे रोजी अर्ज माघारीच्या दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याचे कुतूहल होते. अकोले व मिरजगाव या विभागांच्या प्रत्येकी एका जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध होण्याच्या वाटेवर होत्या. अन्य जागांची उत्सुकता होती. त्यामुळे माघारीच्या दिवशी मंडळाच्या कार्यालयासमोर चांगलीच गर्दी झाली होती. यादिवशी 8जणांनी माघार घेतल्याने अध्यक्ष, मानद सचिव व कार्यकारी विश्‍वस्त मंडळाच्या 15 अशा एकूण 17 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्याची अधिकृत घोषणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे. मात्र, निवडणूक होणार नसलेल्या व होणार असलेल्या जागांची माहिती निवडणूक प्रक्रियेनुसार नोटीस बोर्डावर लावली गेली आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. अशोक कोठारी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. योगेश काळे काम पाहत आहेत.

यांची झाली बिनविरोध निवड
अध्यक्षपदी मोडक शिरीष दामोदर व मानद सचिवपदी जोशी संजय दादा यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांपैकी अहमदनगर विभागातील 10 जागांवर फडणीस अनंत रामचंद्र, बोरा अजित सिमरतमल, झालानी जगदीश रुपनारायण, बेडेकर सुजित श्रीकांत, सारडा मधुसूदन झुंबरलाल, डॉ. कोठारी पारस देवीचंद, खेर मकरंद विष्णू, देसाई अनंत विठ्ठल, कोठारी सुमतीलाल बन्सीलाल व सौ. कुलकर्णी ज्योती रामचंद्र यांची तर श्रीरामपूर विभागातील 3 जागांवर देशपांडे अनिल बाळकृष्ण, उपाध्ये बस्तीराम हनुमानदास व श्रीगोड रणजित रूपचंद निवडले गेले आहे. अकोले विभागाच्या एका जागेवर शहा दिलीपकुमार हिरालाल व मिरजगांव विभागाच्या एका जागेवर डॉ. झरकर रमेश मुरलीधर याआधीच बिनविरोध झाले होते. त्यांच्याविरुद्ध कोणीही अर्ज भरला नव्हता. दरम्यान, अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेले बुडुख मुकुंद राजाराम व मानद सचिव पदासाठी अर्ज भरलेले गट्टाणी अनिलकुमार पांडुरंग आणि बुडुख मुकुंद राजाराम यांनी तसेच कार्यकारिणीच्या नगर विभागातून अर्ज भरलेले गट्टाणी अनिलकुमार पांडुरंग, कुलकर्णी महेश रामचंद्र, चोपडा संजयकुमार फुलचंद, चोपडा मीना संजयकुमार व मुळे सुहास चिंतामण आणि श्रीरामपूर विभागातून अर्ज भरलेले मुळे पुरूषोत्तम दिगंबर यांनी माघार घेतल्याने त्यांचे हिंद सेवा मंडळाच्या नव्या पदाधिकार्‍यांद्वारे आभार मानण्यात आले.

सेवकांच्या सहा जागांसाठी मतदान
हिंद सेवा मंडळाच्या सेवक प्रतिनिधी पदाच्या सहा जागांसाठी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीनजणांनी माघार घेतली. आणखी एकाने माघार घेतली असती तर ही निवडणूकही बिनविरोध झाली असती. पण सेवकांतील राजकारण शिगेला पोहोचल्याने ही माघार झाली नाही व आता सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने त्यासाठी येत्या 29 मे रोजी नगर, श्रीरामपूर, अकोले व मिरजगाव या चार विभागांच्या ठिकाणी मतदान आणि 30 मे रोजी मतमोजणी होणार आहे. यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आवश्यक तयारी सुरू केली आहे. या मतदार संघात 321 सेवक प्रतिनिधी मतदार असून, नगरला 123, श्रीरामपूरला 151, अकोल्याला 39 व मिरजगावला 8 सेवक मतदार आहेत. विशेष म्हणजे या मतदार संघातील मतदारांना सहा मते देणे सक्तीचे आहे. सहापेक्षा कमी वा सहापेक्षा जास्त मते दिले तर ती मतपत्रिका बाद होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात आता राजापुरे गणेश दशरथ, देशमुख योगेश प्रभाकर, उरमुडे विठ्ठल बाळू, जोशी आदीनाथ रेवणनाथ, लकडे कल्याण नामदेव, सुसरे सुनील दत्तात्रय व पाखरे गिरीश माणिकराव असे 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या रिंगणातून जोशी अधिक सुरेश, केणे नितीन गोविंद व कुलकर्णी बाळासाहेब उद्धवराव यांनी माघार घेतली आहे.

COMMENTS