Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानमधील जोधपूर मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

जोधपूर - जोधपूरच्या चेराई गावात ही घटना घडली आहे. येथे रात्री एक कुटुंब घरात झोपलेलं होतं. यावेळी आरोपी घऱात घुसले आणि चारही जणांची हत्या के

मित्रात मतभेद झाल्याने पोलिस कर्मचार्‍याचा खून
कल्याणमध्ये क्लासहून घरी परतणार्‍या तरुणीची हत्या
व्हिडिओ काढत असल्याचा संशयावरून सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून खून 

जोधपूर – जोधपूरच्या चेराई गावात ही घटना घडली आहे. येथे रात्री एक कुटुंब घरात झोपलेलं होतं. यावेळी आरोपी घऱात घुसले आणि चारही जणांची हत्या केली. मृतांमध्ये सहा महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेह खेचत अंगणात घेऊन आले आणि आग लावली. सकाळी नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. गावकऱ्यांना सकाळी पीडित कुटुंबाच्या घरातून धूर येताना दिसला. ग्रामस्थांनी जाऊन पाहिलं असता सगळेच हादरले. अंगणात चार जळलेले मृतदेह पडलेले होते. यामध्ये सहा महिन्याच्या मुलीचाही मृतदेह होता, जो जवळपास पूर्ण जळाला होता. तर इतर मृतदेह अर्धवट जळाले होते. पोलीस दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आलं. फॉरेन्सिक एक्स्पर्ट घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत. मृत कुटुंब शेतीचं काम करत होतं अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

COMMENTS