Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मियावाकी वनांसाठी चार लाख झाडांची लागवड

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी दोन वर्षात मियावाकी वने उभारण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशास

गदर-2 मधील ‘उड जा काले कावा’ गाण्याचं नवे व्हर्जन रिलीज
Sanjay Raut :गोव्यात आमची लढाई नोटांशीच – संजय राऊत | LOKNews24
करमाळा – कामाचे खोटं श्रेय घेणार असेल तर आम्ही खपवून घेणार नाही – नारायण पाटील | Loknews24

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी दोन वर्षात मियावाकी वने उभारण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. दोन वर्षात चार लाख झाडे मियावाकी पद्धतीने मुंबईत ठिकाठिकाणी लावण्यात आली आहेत. मात्र मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत उद्यान विभागाला मुंबईत आणखी एक लाख झाडे मियावाकी पद्धतीने लावण्याचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे. त्यापैकी 50 हजार झाडे लावण्यात आली असून आणखी पन्नास हजार झाडे लावण्यासाठी 16 ठिकाणी मियावाकी वने विकसित करण्यात येणार आहेत.
मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेने मियावाकी पद्धतीने शहरी जंगल उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत चार लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. कमी जागेत अधिकाधिक झाडांची लागवड करण्यात येणार्‍या जपानी पद्धतीची ‘मियावाकी’ वने विकसित करण्याच्या या प्रकल्पाची सुरूवात 26 जानेवारी 2020 रोजी करण्यात आली होती. दोन वर्षात चार लाख झाडांची लागवड करण्यासाठी 64 लहान-मोठ्या भूखंडांची निवड करण्यात आली होती. एका चौरस मीटरमध्ये तीन झाडे याप्रमाणे वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत एक लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर मियावाकी वने विकसित करण्यात आल्याची माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. दरम्यान, मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत आणखी एक लाख झाडे मियावाकी पद्धतीने लावण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार आतापर्यंत 50 हजार झाडे लावण्यात आली असून मार्चपर्यंत आणखी 50 हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट्य प्रशासनाने ठेवले आहे. त्याकरीता आणखी 16 लहान-मोठे भूखंड निवडून ते शहरी जंगल म्हणून विकसित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मियावाकी वनांसाठी देशी झाडांची लागवड करण्यात येते. त्यामुळे हरित क्षेत्र वाढण्याबरोबरच देशी झाडांची संख्याही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS