Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशातील अपघातात चार मित्रांचा मृत्यू

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली.  हसनपूर-गजरौला मार्गावरील मनोटा पुलावर इर्टिगा आणि बोलेरो कारची समोरासमोर धडक झ

इस्कॉन ब्रीजवर भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू अनेक जखमी
चंद्रपूर मध्ये एक भीषण अपघात.
स्कार्पिओ पलटी होऊन शिरली चहाच्या दुकानात (Video)

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली.  हसनपूर-गजरौला मार्गावरील मनोटा पुलावर इर्टिगा आणि बोलेरो कारची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत 4 जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शाहनवाज (वय 19) अबाद्दन (वय 18) तहसीम (वय 17) बबलू (वय 17) अशी मृत तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही अल्लीपूर, गजरौला येथील रहिवासी होते.

COMMENTS