Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

बीड ः राज्यात अपघाताचे सत्र सुरूच असून, बीडमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर आणि स्विफ्ट कारची धडक झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले

ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू
गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक

बीड ः राज्यात अपघाताचे सत्र सुरूच असून, बीडमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर आणि स्विफ्ट कारची धडक झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात पावसामुळे समोरील कंटेनर न दिसल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झाला.
मृत सर्व लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी आहेत. या घटनेत स्विफ्टकारचा चक्काचूर झाला आहे. मृतांची नावे समजू शकली नाहीत. शनिवारी रात्री उशीरा जगलपूर येथील चौघेजण स्विफ्ट कारमधून (एमएच 24 एएस 6334) छत्रपती संभाजीनगरला जात होते. बीड येथे शनिवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. त्यांची कार अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्ग्याजवळ आली असता, पावसामुळे समोरून येणार्‍या कंटेनरचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. तर कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीतून सर्व मृतदेह बाहेर काढले. तसेच हे मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले आहे. लातूर येथे अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना आता बीड येथे कार कंटेनरचा अपघात झाला. यात चौघांना जीव गमवावा लागला आहे.

COMMENTS