पुणे : पुणे महापालिकेकडून पाणी कपात सुरू करण्यात आलेली असली तरी १० जुलै रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण असल्याने चार दिवसांसाठी पाणी कपात मागे घे
पुणे : पुणे महापालिकेकडून पाणी कपात सुरू करण्यात आलेली असली तरी १० जुलै रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण असल्याने चार दिवसांसाठी पाणी कपात मागे घेण्यात आली आहे. ८ जुलै ते ११ जुलै या दरम्यान शहरात नियमित पाणीपुरवठा होईल असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठा कमी झाल्याने महापालिकेने शहरात ४ ते ११ जुलै पर्यंत दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाणी कपात सुरू असताना शहराच्या अनेक भागात दोन दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता सण आल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आलेला आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ८ जुलै ते ११ जुलै या दरम्यान पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS