Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध वाळू उपसाप्रकरणी चौघे ताब्यात; 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश

पुसेगाव / वार्ताहर : खटाव येथील भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन सुरू असताना सातारा गुन्हे शाखा व पुसेगाव पोलिसांकडून कार

रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण काळाची गरज
डाँ.तनपुरे कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी नसताना गुपचुप उरकला गळीत शुभारंभ
इथेनॉलमधील 75 टक्के हिस्सा शेतकर्‍यांना द्या : माजी खा. राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा

पुसेगाव / वार्ताहर : खटाव येथील भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन सुरू असताना सातारा गुन्हे शाखा व पुसेगाव पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याप्रसंगी करण राजेंद्र पाचांगणे (वय 22, रा. खटाव), कैलास अंकुश गलांडे (वय 24, रा. खटाव), ओंकार ऊर्फ प्रथमेश धनाजी पाटोळे (रा. वय 21, खटाव), निलेश बाळू मदने (वय 30, रा. खटाव) या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईत जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह 26 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतूक करणार्‍यांवर परिणामकारक कारवाई करण्याबाबत एक पथक तयार करून सातारा जिल्ह्यात अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. या अनुषंगाने पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास खटाव येथे भराडेवस्ती येथे येरळा नदीच्या पात्रात पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.
त्या वेळी काही लोक जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने वाळू उपसा करून नदीपात्राजवळ वाळूचा डेपो करत होते. या ठिकाणी अंदाजे 5 ब्रास वाळूचा डेपो तयार केला असल्याचे निदर्शनास आले. वाळू डेपोवर महसूल विभागामार्फत कारवाई करण्याची तजवीज ठेवली. त्या वेळी करण पाचांगणे, कैलास गलांडे, ओंकार पाटोळे, नीलेश मदने यांच्यासह जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे येथे हजर केले. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहायक फौजदार तानाजी माने, हवालदार संतोष पवार, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, अमोल माने, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, गणेश कापरे, स्वप्निल दौंड, प्रवीण पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख व पुसेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार पाटील व चालक डोंबे यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.

COMMENTS