Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोधेगाव शाळेतील माजी विद्यार्थी 18 वर्षांनी आले एकत्र

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोधेगाव या विद्यालयामध्ये 2006 साली दहावीमध्ये शिक्षण घ

कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी नगरमध्ये कँडल रॅली..
त्या अपात्र संचालकांनी रिझर्व्ह बँकेला डिवचले…
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा वाजला बिगुल

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोधेगाव या विद्यालयामध्ये 2006 साली दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी 26 मे 2024 रोजी संपन्न होऊन तब्बल 18 वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी तसेच विदयालयांचे सेवानिवृत्त शिक्षक एकमेकांना भेटुन शाळेच्या जुन्या आठवणीत रममाण झाले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकवृंदाचा सन्मान केला. विद्यालयाचे माजी सहशिक्षक दाभाडे एम. व्ही. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी पाटील, पंडोरे, साळवे, निंबाळकर, दाभाडे, शिंदे, रांधवणे, वाबळे, गोरे मामा व विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य जुंदारे आदी या प्रसंगी उपस्थित होते. या वेळी माजी विद्यार्थी संदीप शिरसाठ व गणेश भोकरे यांनी प्रास्ताविक केले. तसेच शिवाजी शिरसाठ यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याची संकल्पना मांडणार्‍या सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य जुंदारे, माजी शिक्षक शिवाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या गमतीजमती तसेच आठवणी सांगून सर्वांना भुतकाळात नेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव भुजाडे यांनी तर उपस्थितांचे आभार निलम शिंदे हिने मानले.

COMMENTS