Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य सातपुते

अकोले ः  रोटरी क्लब अकोले सेंट्रलची सन 2024-2025 या वर्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते

काढलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवा ः सरफराज पठाण
जागतिक शांतता व सलोखा साठी महात्मा गांधींचे विचार प्रेरणादायी – सॅम पित्रोदा
सिव्हिलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक

अकोले ः  रोटरी क्लब अकोले सेंट्रलची सन 2024-2025 या वर्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सचिवपदी अमोल देशमुख, उपाध्यक्षपदी दिनेश नाईकवाडी, सहसचिव पदी समीर सय्यद तर खजिनदार पदी संदीप मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष सुनील नवले यांनी ही माहिती दिली. रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी सामाजिक संस्था आहे. पाच वर्षीपूर्वी अकोले येथे रोटरी क्लब ची स्थापना करण्यात आली. स्थापनेनंतर अकोले तालुक्यात विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, व्याख्याने, वारकरी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार, वृक्षारोपण, कोरोना काळात लस जन जागृती, राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार, कृषी जीवन गौरव पुरस्कार, विविध क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार, कृषी दिन, डॉक्टर्स डे, स्त्री जन्माचे स्वागत, त्याविषयी शपथ, आदींसह विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविले. यावर्षी देखील क्लबच्या माध्यमातून सर्व समावेशक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रो.विद्याचंद्र सातपुते यांनी सांगितले. नूतन अध्यक्ष  रो.विद्याचंद्र सातपुते हे अकोले आय.टी.आय.चे सेवा निवृत्त प्राचार्य असून जेष्ठ पत्रकार आहेत.त्यांचे अकोले तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.त्यांनी रोटरी क्लब मध्ये बुलेटिन एडिटर, उपाध्यक्ष, सेक्रेटरी या पदावर काम केलेले आहे. तर नूतन सचिव अमोल देशमुख हे अकोले, संगमनेर येथील संदेश चष्माघरचे मालक असून त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले असुम त्यांनी अकोले येथे त्यांचा स्वतःचा गाळा रोटरी आय केअर सेंटर उभारण्यासाठी मोफत दिला आहे.या सेंटर मार्फत नागरिकांचे डोळे तपासले जाणार आहेत. उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी हे सेलिब्रेशन फोटो स्टुडिओ चे मालक असून ते उत्तम व यशस्वी व्यावसायिक आहेत.त्यांनी मागील वर्षी रोटरी क्लब चे खजिनदार पद सांभाळले आहे. सहसचिव रो.समीर सय्यद हे स्टार मोबाईल शॉपी व।चे मालक असून ते सामाजिक कार्यात सतत कार्यरत असतात.खजिनदार रो. संदीप मोरे हे परफेक्ट स्नॅक्स सेंटर व अगस्ति स्वीट होमचे मालक आहेत. नूतन पदाधिकारी व संचालक मंडळ व सदस्य यांचे  सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

रोटरी क्लबची नूतन कार्यकारिणी – सन 2024-25 या वर्षासाठी विविध योजनांची, कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील संचालक मंडळाची निवड करण्यात आली. त्यामध्ये सुनील नवले आय.पी.पी. अँड रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट मेंबर, सचिन आवारी-डिस्ट्रिक्ट पोलिओ  युथ को-ऑर्डीनेटर, डॉ. रवींद्र डावरे- क्लबट्रेनर, यश चोथवे-डायरेक्टर, सर्व्हिस प्रोजेक्ट लोकल, डॉ. सुरींदर वावळे-टी. आर.एफ.डायटेक्टर, ऍड.बी.जी.वैद्य-डायरेक्टर क्लब एडमिनीस्ट्रेशन,रो.सचिन देशमुख- डायरेक्टर, मेंबर्स  डेव्हलपमेंट, दीपक महाराज देशमुख-पब्लिक इमेज, डॉ.संजय ताकटे- डायरेक्टर, कम्युनिटी डेव्हलपमेंट,रो.गंगाराम करवर- डायरेक्टर, ह्युमन डेव्हलपमेंट,रो.सचिन शेटे- डायरेक्टर, व्होकेशनल सर्व्हिस, डॉ. जयसिंग कानवडे- डायरेक्टर, इंटरनॅशनल सर्व्हिसेस, रो.सचिन आहेर- डायरेक्टर युथ सर्व्हिसेस, किरण गजे- वॉटर मॅनेजमेंट, अमोल वैद्य- आर.आय. डिस्ट्रिक्ट इंफासीस, संदीप मालुंजकर- डायरेक्टर, इन्व्हायरमेन्ट, उमेश साबळे- डायरेक्टर वूमेन एम्पोयरमेन्ट, डॉ. संतोष तिकांडे डायरेक्टर,पॉझिटिव्ह हेल्थ, अनिल देशमुख- डायरेक्टर कल्चरल,रो- रोहिदास जाधव सार्जंट ऍट आर्म्स,रो. अरुण सावंत-डायरेक्टर, स्पेशल प्रोजेक्ट, संदीप नेहे डायरेक्टर स्पोर्ट प्रमोशन, संदीप भोर डायरेक्टर डी.ई.आय.

COMMENTS