Homeताज्या बातम्यासंपादकीय

माजी पंतप्रधानांच्या नातवाला जन्मठेपेची शिक्षा !

कर्नाटकातील माजी जेडी(एस) खासदार तथा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याला शनिवारी म्हैसूरमधील 47 वर्षीय घरगुती कामगार महि

किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव
कृतज्ञता जगण्याचा युगधर्म झाला पाहिजे ः डॉ. बाबुराव उपाध्ये
विद्यार्थ्यांने शाळेतच काचेने चिरला मित्राचा गळा

कर्नाटकातील माजी जेडी(एस) खासदार तथा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याला शनिवारी म्हैसूरमधील 47 वर्षीय घरगुती कामगार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची आणि ११ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची शिक्षा करण्यात आली आहे.११ लाख रुपयांचा दंड बलात्कार पीडितेला भरपाई म्हणून दिला जाईल. खटला दाखल झाल्यानंतर अवघ्या १४ महिन्यांनी निकाल देण्यात आला, खटला उल्लेखनीय गतीने पूर्ण झाला.गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) सायबर क्राइम स्टेशनमध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात रेवण्णाने महिलेवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आणि अनैतिक कृत्य नोंदवल्याचा आरोप केला. हसन मतदार संघामधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार असलेले प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले होते, जेव्हा त्यांनी चित्रित केलेले  व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह निवडणुकीपूर्वी प्रसारित करण्यात आले होते. तथापि, रेवन्ना यांनी दावा केला होता की त्याच्याशी संबंधित “अश्लील व्हिडिओ” मॉर्फ केले गेले आहेत आणि या संदर्भात तक्रार दाखल केली होती. ३१ डिसेंबर २०२४ रोजी खटला सुरू झाला. पुढील सात महिन्यांत, न्यायालयाने २३ साक्षीदारांची तपासणी केली आणि व्हिडिओ क्लिपच्या मुख्य फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेच्या अहवालांचे तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळावरील स्पॉट तपासणी अहवालांचे पुनरावलोकन केले. तपास आणि चाचणी दरम्यान, पीडितेने भौतिक पुरावा म्हणून एक साडी सादर केली, जी तिने जपून ठेवली होती. फॉरेन्सिक विश्लेषणाने नंतर साडीवर शुक्राणूंच्या उपस्थितीची पुष्टी केली, जी न्यायालयात सादर केली गेली आणि बलात्कार सिध्द करण्यासाठी हा मुख्य पुरावा म्हणून स्वीकारला गेला. सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी), निरीक्षक शोभा यांच्या नेतृत्वाखाली, तपासादरम्यान १२३ प्रकारचे पुरावे गोळा केले आणि सुमारे २ हजार पृष्ठांचे मोठे आरोपपत्र सादर केले. रेवन्ना यांना कलम ३७६(२)(के) आणि ३७६(२)(एन) सह कलम ३५४(ए), ३५४(बी) आणि ३५४(सी) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.  प्रज्वलने त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात येताच देश सोडून पळ काढला होता. होलेनरासीपुरा येथील पीडितेने सुरुवातीला त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ३१ में २०२४ रोजी बेंगळुरूला परतल्यावर त्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जाहीर आवाहनानंतर त्याचे पुनरागमन झाले होते. देवेगौडा यांचा नातू आणि केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचा मुलगा असलेल्या प्रज्वलला बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते आणि त्याच्या अनेक जामीन याचिका सर्व न्यायालयाने फेटाळल्या होत्या. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात संताप निर्माण करणाऱ्या व्हिडिओंपैकी एकामध्ये होलेनारसीपुरा येथील एका फार्महाऊसमध्ये एका वृद्ध घरगुती कामगार महिलेवर  लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये, ती महिला प्रज्वलकडे विनवणी करताना दिसते आहे की, तिने त्याचे वडील आणि इतर कुटुंबातील वडिलधाऱ्यांना जीवन दिले आहे. मात्र, हैवान बनलेल्या प्रज्वलला याची चिंता नव्हती. आज तर, निर्लज्जपणा करिता शिक्षा कमी करण्यासाठी त्याने न्यायाधीशांकडे दाद मागितली. त्याने कोर्टाला सांगितले की, तो बीई मेकॅनिकल पदवीधर आहे आणि तो नेहमीच गुणवत्तेवर उत्तीर्ण झाला आहे. “… त्या निवडणुकीच्या  सहा दिवस आधी आल्या होत्या… फिर्यादी पक्षाने त्यांना हेतुपुरस्सर आणले आणि त्यांना तक्रार करायला लावली,” असे प्रज्वलने न्यायालयात सांगितले. महिलेने (पीडित) कथित बलात्काराबाबत तिच्या पती किंवा नातेवाइकांसह कोणाकडेही तक्रार केली नसल्याचे नमूद करून, तो म्हणाला की, जेव्हा काही व्हिडिओ प्रसारित केले गेले; तेव्हा ती येते आणि तक्रार देते. मात्र, आपण न्यायालयाच्या निर्णयापुढे नतमस्तक होणार असल्याचे सांगून प्रज्वल म्हणाला, “मलाही एक कुटुंब आहे, मी आता सहा महिन्यांपासून माझ्या आई आणि वडिलांना पाहिले नाही….. कृपया मला कमी शिक्षा द्या, मी न्यायालयाला विनंती करतो.” गेल्या वर्षी मे महिन्यात जर्मनीहून आल्यानंतर अटक करण्यात आलेल्या प्रज्वलने न्यायालयात सांगितले की, “माझ्या आयुष्यात राजकारणात झपाट्याने वाढ होत असलेली एकच चूक मी केली आहे, असे निर्लज्जपणाने सांगणाऱ्या रेवन्ना विरोधात या व्यतिरिक्त अजून ३ खटले नोंदवले गेले आहेत.

COMMENTS