Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी बांधले शिवबंधन

चुकीला माफी, पण पापाला कदापी माफी नाही ः उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाला लागलेली गळती आता दूर होत असून या पक्षामध्येही इनकमिंग होतांना दिसून येत आहे. बुधवारी मातोश्रीवर शिर्डीचे माजी खासदा

राहुरी फॅक्टरी येथे ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन
नदीत बुडालेल्या बालकाचा मृतदेह 23 तासाने सापडला I LOKNews24
‘चला हवा येऊ द्या’ मध्ये अशोक सराफ यांचा अपमान.

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाला लागलेली गळती आता दूर होत असून या पक्षामध्येही इनकमिंग होतांना दिसून येत आहे. बुधवारी मातोश्रीवर शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर तोफ डागतांना म्हटले की, वाकचौरेंनी त्यांच्याकडून चूक झाल्याचे सांगत माफी मागितली. मात्र वाकचौरेंनी माफी मागायची गरज नाही. शिवसैनिक चुकीला माफी देतो, पापाला माफी देत नाही. शिवसेनेचा आवाज दिल्लीचे तक्त हालवल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात श्रद्धा व सबुरी हवी मात्र आता जे दिल्लीत बसलेत त्यांना सबुरी अजिबात नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला
शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांनी हाती शिवबंधन बांधले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे, सुधीर वायखिडे यांनीदेखील त्यांच्या समर्थकांसह मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केलेे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिर्डीत ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून, त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघात उमेदवार देण्याची रणनीती आखण्यात येत असून, त्याठिकाणी संभाव्य उमेदवाराला ठाकरे गटाकडून बळ देण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे 13 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे पुन्हा हे मतदारसंघ जिंकण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार उद्धव ठाकरेंकडून शोधला जात आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळ् अहमदनगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. शिर्डीतून वाकचौरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या 2014 साली उमेदवारी जाहीर होऊनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.

माजी आमदार भदे ठाकरे गटाच्या वाटेवर   – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे आता राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली आहे. येत्या 2 सप्टेंबरला बैठक होणार असून त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान हरिदास भदे हे वंचित म्हणजेच पूर्वीच्या भारिप बहूजन महासंघाच्या तिकीटावर 2004 ते 2014 या कालावधीत अकोला पूर्वचे आमदार होते. दरम्यान सुरुवातीला भारिप, काँग्रेस पुन्हा वंचित त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा भदेंचा राजकीय प्रवास आहे.

COMMENTS