Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नव वधु-वरास दिल्या शुभेच्छा

लातूर प्रतिनिधी - राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि

बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन कर्मचार्‍यांचे संगनमत; 3.26 कोटींचा केला अपहार
…तर, आमदारांच्या निवासासमोरच राहुटी टाकणार
टोप्यांच्या घरात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ

लातूर प्रतिनिधी – राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. 7 मे रोजी दुपारी लातूर शहरानजीक असलेल्या शांताई मंगल कार्यालय येथे आयोजित लातूर तालुक्यातील हणमंतवाडी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अच्युतराव माने यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमर व गंगाखेड तालुक्यातील सुरळवाडी येथील प्रकाश सोलव यांची सुकन्या मोहिनी यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव-वधूवरास पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. समद पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, गणेश एस. आर.देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजकुमार पाटील, लालासाहेब देशमुख, संजय माने, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक सुभाष घोडके, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, बालाजी वाघमारे, शिवाजी कांबळे आदिसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच माने व सोलव कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होता.

COMMENTS