नवी दिल्ली ः संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये परराष्ट्री मंत्री पदावर कार्य केलेले माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ

नवी दिल्ली ः संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये परराष्ट्री मंत्री पदावर कार्य केलेले माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, जिथे त्यांना गेल्या काही आठवड्यांपासून दाखल करण्यात आले होते. नटवर सिंह यांनी 2004-05 दरम्यान संपुआ-1 सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले. या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणूनही काम केले आणि 1966 ते 1971 या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयात ते संलग्न होते. नटवर सिंह यांचा जन्म 16 मे 1931 रोजी राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव कुंवर नटवर सिंह होते आणि ते राजघराण्यातील होते. त्यांचे शिक्षण मेयो कॉलेज, अजमेर आणि केंब्रिज विद्यापीठातून झाले. त्यानंतर ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले आणि 1953 मध्ये त्यांनी सेवा सुरू केली होती. मुत्सद्दी म्हणून के. नटवर सिंह यांची कारकीर्द खूप मोठी होती. ते पाकिस्तान, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे राजदूत होते.
COMMENTS