Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी उपसरपंचाचा कुर्‍हाडीने घाव घालून हत्या

जालना/प्रतिनिधी : श्रीक्षेत्र राजूर येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी उपसरपंच गोरक्षनाथ आत्माराम कुमकर (55)यांची रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अज

तुर्भेत वडापाव विक्रेत्याकडून रिक्षा चालकाची हत्या
वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याची हत्या
राहुरी तालुक्यात तरूणाचा खून करून मृतदेह फेकला विहिरीत

जालना/प्रतिनिधी : श्रीक्षेत्र राजूर येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी उपसरपंच गोरक्षनाथ आत्माराम कुमकर (55)यांची रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात मारेकर्‍यांनी कुर्‍हाडीने डोक्यात आणि मानेवर घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेत मारेकरी तेथून पसार झाले आहेत.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील काही दिवसांपासून जालना शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास पोलिसांना अपयश येत आहे.अशा घटनांमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ बिघडत असून संबंधित गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS