माजी उपमहापौर कोतकरांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी उपमहापौर कोतकरांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरचे उपनगर असलेल्या केडगाव येथे सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी काँग्रेसच्या माजी उपमहापौर सुवर्णा कोत

रॅपिड अँटिजन किट तातडीने उपलब्ध करुन द्या :स्नेहलताताई कोल्हे
बबनराव बाळाजी कुटे यांचे निधन
लॉटरीतून मिळणार गरीब मुलांना मोफत शाळा प्रवेश

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरचे उपनगर असलेल्या केडगाव येथे सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी काँग्रेसच्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायाधीशांद्वारे कोतकर यांचा अटकपूर्व जमीन मंजूर झाला आहे. काही अटी आणि शर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे.
महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात केडगावमध्ये सात एप्रिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींकडून सुवर्णा कोतकर यांच्याबद्दल माहिती तपास करणार्‍या सीआयडीच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सीआयडीने सुवर्णा कोतकर यांचे नाव या गुन्ह्यात नोंदविले. काही दिवसांपूर्वी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला होता. सुरुवातीला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. त्याला आव्हान देण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोतकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून सुवर्णा कोतकर फरारी होत्या. मात्रं आता त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

COMMENTS