Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी नगरसेवक जगदीश पवार यांच्या प्रयत्नांना यश

मनपाकडून आरोग्य विभागासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती

लोकमंथन प्रतिनिधी - नाशिक महापालिकेत गेल्या २४ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. महापालिकेचा आकृतिबंध हा वर्गसंवर्गानुसार असून, ७०९२ पदे मंजूर अस

नाशिकचे आरोग्यदूत जगदीश पवार यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर  
आरोग्यदूत जगदीश पवार यांचेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार  
बिटको रुग्णालयात तंत्रकुशल मनुष्यबळ हवे ; माजी नगरसेवक जगदीश पवार यांची मागणी  

लोकमंथन प्रतिनिधी – नाशिक महापालिकेत गेल्या २४ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. महापालिकेचा आकृतिबंध हा वर्गसंवर्गानुसार असून, ७०९२ पदे मंजूर असून, त्यात अडीच हजार पदे रिक्त आहेत. दरम्यान, होऊ घातलेल्या नोकरभरतीत कंत्राटी कामगारांना व स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, तसेच पालिका रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने असलेल्या डॉक्टरांना कायम करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. त्याच धर्तीवर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तात्पुरत्या स्वरपात भरती प्रक्रिया सुरू केली आहेत. मनपा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरील वैद्यकिय अधिकारी, स्टाफनर्स व ए. एम. एन. करीता अर्ज बोलविले असले तरी ही भरती प्रकिया स्थानिक व गरजु बेरोजगारांना प्राधान्य देईल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहेत.सदर भरती प्रकियेची माहिती मनपा च्या अधिकृत वेबसाईटवर किंवा नोटीसबोर्ड वर छाननी अंती उपलब्ध होईल असे मनपाकडून प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहेत.

मनपा प्रशासनाने दिलेल्या निवेदनाचा विचार नक्की केला आणि जवळ पास आरोग्य विभागात १०० जवळपास पदे भरणेसाठी जाहिरात /प्रसिद्धीपत्रक  देखील काढले परंतु इतर विषय देखील गंभीर असून जनता सातत्याने त्रासाला सामोरे जाते तेव्हा एक दक्ष नगरसेवक म्हणून माझे कर्तव्य मी पार करत असतो मात्र सद्यस्थितीत कार्यरत कंत्राटी कामगारांना व स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे ही खंत देखील प्रशासन पूर्ण करेल अशी अपेक्षा आहेत आणि उर्वरित पदे लवकरात लवकर भरून मागील काही वर्षापासून कार्यरत असलेले कंत्राटी कामगारांना कायम करावे. 

COMMENTS